आज क्रिकेटप्रेमींसाठी मोठा आणि खास दिवस आहे. कारण विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा याकडे खिळल्या आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा हा अंतिम सामना रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी २ वाजता हा सामना सुरू होणार आहे. त्यापूर्वी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी अहमदाबादला रवाना झाले आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ असे अनेक सेलिब्रिटी अहमदाबादला रवाना झाले आहेत. यासंबंधिचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर अनेक सेलिब्रिटींचे अहमदाबादला रवाना होतानाचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण पती रणवीर सिंह आणि वडील प्रकाश पदुकोण यांच्याबरोबर विमानतळावर पाहायला मिळाली. यावेळी दीपिका आणि रणवीरने टीम इंडियाची जर्सी दिसली. आता तिघंही भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी अहमदाबादला रवाना झाले आहेत.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने बहिणीच्या लग्नातले खास फोटो केले शेअर; म्हणाला, “अमृता खूप…”

दीपिका शिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार दग्गुबाती वेंकटेश विमानतळावर पाहायला मिळाला. तसेच सकाळी-सकाळी अभिनेते अनिल कपूर देखील अहमदाबादला भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पाहण्यासाठी रवाना झाले. शिवाय “भारतच जिंकणार”, असं म्हणताना जॅकी श्रॉफ विमानतळावर दिसले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.