जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मुळची श्रीलंकन असलेल्या जॅकलिनने २००९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनयाच्या जोरावर जॅकलिनने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. सुकेश चंद्रशेखरमुळे जॅकलिन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

जॅकलिन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. जॅकलिनने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने हायस्लिट ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केला आहे. केस मोकळे सोडत जॅकलिनने फोटोसाठी हटके पोझही दिल्या आहेत. जॅकलिनचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.नुकत्याच पार पडलेल्या झी सिने अवॉर्डसाठी जॅकलिनने हा लूक केल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. पण नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट करत जॅकलिनला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> …अन् ऋता दुर्गुळेने चाहत्यांकडेच मागितला मोबाईल नंबर, नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

हेही वाचा>> इरफान खानच्या गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याला समजलं अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुकेश भाई तुला मिस करत आहेत” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “हे बघून सुकेश पागल होऊन जाईल”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “इंडस्ट्रीची गोल्ड डिगर”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. आणखी एका युजरने “टीम सुकेश गोल्ड डिगिंग आणि टीम साजिद करिअर लॉन्चिंग”, असंही म्हटलं आहे. “केसांत उवा असतील तर आवळा तेल लाव” अशी कमेंटही एकाने केली आहे.

हेही वाचा>> गायक अरमान मलिकला दोन बायका असलेल्या युट्यूबरच्या पत्नीने सुनावलं, म्हणाली “माझ्या नवऱ्याची…”

जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या घोटाळ्यात घेण्यात आलं होतं. मनी लॉड्रिंग प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुकेश चंद्रशेखरचे जॅकलिनबरोबर प्रेमसंबंध होते. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचं त्याने सांगितलं आहे.