बॉलिवूडच्या अभिनेत्री जितक्या भूमिकेसाठी,लूकसाठी मेहनत घेतात तितकीच मेहनत आपल्या फिटनेससाठीदेखील घेतात. अनेकदा पापाराझी अभिनेत्रींना जिमबाहेर भेटून त्यांचे फोटो काढतात. मलायकाचे जिममधले अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नुकताच दीपिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

दीपिकाने जिममधला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने असं म्हंटल आहे की मी जिममध्ये मेहनत घेत आहे मात्र कतरीना कैफ… व्हिडीओमध्ये दीपिका जिममधील झोपाळ्यात आराम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ कतरिनाने शूट केला आहे. दीपिका कतरीना एकाच जिममध्ये जात आहेत. दोघी आपल्या फिटनेससाठी मेहनत घेत आहेत. मात्र असे रिकाम्या वेळात असे मजेशीर व्हिडिओ काढले जात असतात.

“धर्माला राज्यकारभारात…” केजरीवालांच्या नोटांवरच्या मागणीला संगीतकार विशालने लगावला टोला

दीपिकाच्या या व्हिडीओची चर्चा बॉलिवूडमध्येदेखील होत आहे. ईशान खट्टरने या मजेशीर व्हिडीओवर कॉमेंट केली आहे. ‘द ममी रिटर्न्स’ तर वरुण धवनला हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झाले नाही त्याने हाहाहा अशी कॉमेंट केली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओच कौतुक केलं असून दोघींना कॅतपिका असे नावदेखील ठेवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरीना लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे अभिनेते दिसणार आहेत. तसेच ती ‘टायगर ३’ या चित्रपटात सलमान खान बरोबर झळकणार आहे. दीपिका शाहरुख खान, जॉन अब्राहम बरोबर ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.