"तू तुझ्या आईला..." अभिनेत्री नेहा धुपियाची मुलाच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट व्हायरल | bollywood actress neha dhupia wishes her son on his first birthday through instagram post | Loksatta

“तू तुझ्या आईला…” अभिनेत्री नेहा धुपियाची मुलाच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट व्हायरल

नेहा ‘रोडीज’ या शोमुळेही कायम चर्चेत असते.

“तू तुझ्या आईला…” अभिनेत्री नेहा धुपियाची मुलाच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट व्हायरल
नेहा धुपिया | neha dhupia

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया ही चित्रपटात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती बरीच सक्रिय आहे. चित्रपटापासून फारकत घेतल्यावर तिने काही रीयालिटि शोमध्ये परीक्षकाची भूमिकाही बजावली होती. बोल्ड हॉट फोटोज आणि बेधडक वक्तव्यं यासाठी नेहा जास्त ओळखली जाते. नेहा सध्या पुन्हा चर्चेत आहे. आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिने एक खास पोस्ट केली आहे.

गेल्यावर्षी ३ ऑक्टोबरला नेहा आणि अंगद यांना दूसरा मुलगा झाला होता. त्याचं नाव त्यांनी गुरीक सिंग धुपिया बेदी असं ठेवलं होतं. आपल्या लाडक्या मुलाबरोबरचे काही सुंदर फोटो नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केले आहेत. यामध्ये नेहाने लिहिलं आहे की, “आमच्या लाडक्या बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तू तुझ्या आईला समोरच्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करायला शिकवलंस. माझं म्हणजेच या आईचं काळीज हे कायम तुझ्यापाशीच असेल आणि सदैव राहील.”

आणखी वाचा : ‘आशिकी’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला राहुल रॉय म्हणाला, “आशिकी ३ साठी कार्तिक आर्यनला…”

नेहाच्या या पोस्टवर सबा अली खान, महिप कपूर, सोफी चौधरी अशा काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॉमेंट करत गुरीकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेस. नेहा दुसऱ्यांदा गरोदर असताना तिने ‘अ थर्सडे’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं, त्यातही तिची भूमिका एका गरोदर पोलिस ऑफिसरची होती. गुरीकला जन्म दिल्यावर लगेचच नेहाने पुन्हा तिचं काम सुरू केलं आहे.

नेहाने अभिनेता अंगद बेदी याच्याशी लग्न केलं. त्यांना ३ वर्षांची एक गोड मुलगीदेखील आहे जिचं नाव त्याने मेहेर ठेवलं आहे. मध्यंतरी नेहा आणि अंगद यांनी मेहेरचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले, जे चांगलेच व्हायरल झाले होते. नेहा ‘रोडीज’ या शोमुळेही कायम चर्चेत असते. नेहाचा पती अंगद बेदी हा त्याच्या ‘पिंक’ आणि ‘इनसाइड एज’मधील भूमिकांसाठी जास्त लोकप्रिय आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘आशिकी’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला राहुल रॉय म्हणाला, “आशिकी ३ साठी कार्तिक आर्यनला…”

संबंधित बातम्या

शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
“माझ्या किसिंग सीनचा व्हिडीओ मुलाने पाहिला अन्…” लेकालाच मुर्ख म्हणत ट्विंकल खन्नाचा खुलासा
गरोदर असल्याच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन, म्हणाली…
‘दृश्यम २’ नंतर अजय देवगणच्या ‘सिंघम’ची चर्चा; चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
अमिताभ बच्चन यांनी फेडलं होतं ९० कोटींचं कर्ज; परेश रावल ‘त्या’ प्रसंगाची आठवण करत म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी
FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत
FIFA World Cup 2022 : गोलफरकामुळे मेक्सिकोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
कास पठाराला घातलेले कुंपण काढण्यास सुरुवात