अभिनेत्री सारा अली खान व कार्तिक आर्यन एकेकाळी रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत असायचे. दोघांचे एकत्र फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतं. दोघांचा ‘सार्तिक’ नावाचा हॅशटॅग देखील चाहत्यांनी केला होता. सारा व कार्तिकची केमिस्ट्री इम्लियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’मध्ये पाहायला मिळाली होती. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सारा व कार्तिकच्या ब्रेकअपचे वृत्त तुफान व्हायरल झालं होतं. तरी देखील दोघं अनेकदा एकत्र पाहायला मिळाले. अशातच सध्या सारा व कार्तिकचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. ज्यामध्ये सारा, कार्तिकसह करीना कपूर व करिश्मा कपूर दिसत आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘वरिंदर चावला’च्या इन्स्टाग्राम पेजवर सारा अली खान व कार्तिक आर्यनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात सारा व कार्तिक करीना कपूर व करिश्मा कपूर यांच्यासह ‘६९वा फिल्मफेअर अवॉर्ड’ शो आटोपून मुंबई विमानतळावर पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओत सारा करीना कपूर समोर कार्तिकला फ्लाइंग किस देताना दिसत आहे. यानंतर कार्तिक पुढे जाऊन साराला मिठी मारून निरोप देताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – आधी लग्न न करताच झाली आई, आता अभिनेत्रीने दुसऱ्या बॉयफ्रेंडसह केला साखरपुडा, फोटो व्हायरल

सारा व कार्तिकला एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “व्वा…सारा कार्तिक, मी स्वप्न पाहत आहे का?”, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सारा व कार्तिक पुन्हा एकदा परत आले पाहिजे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हे दोघं खरंच एकमेकांचे एक्स आहेत का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सारा अली खान जेव्हा वडील सैफ अली खानबरोबर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिने कार्तिक आर्यनचं खूप कौतुक केलं होतं.