आजकाल बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये बडे अभिनेते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहेत. नुकताच बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून झळकला होता. आता अभिनेत्रीदेखील यात मागे नाहीत. अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील आगामी चित्रपटात एका गाण्यात आपल्याला दिसणार आहे.

आपल्या सौंदर्याने, अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रद्धा कपूर आता ‘भेडिया’ चित्रपटातील एका गाण्यात दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात क्रितीच्या बरोबरीने श्रद्धादेखील ठुमके लावताना दिसत आहे. या गाण्यात वरुण धवनदेखील दिसत आहे. हे गाणे गीतकार अमिताभ भट्टाचार्य याने लिहले असून सचिन जिगर यांनी संगीतबद्ध तसेच गाणे गायले देखील आहे. सध्या या गाण्याची हवा आहे. बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना एकत्र पाहता येणार आहे.

‘तारक मेहता…’ मालिका सोडण्यावरून शैलेश लोढा झाले भावुक; म्हणाले, “माझा नाईलाज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्या दोघांचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील त्या दोघांचे लूक्स समोर आले होते. या ट्रेलरलाही लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. आता प्रेक्षक त्यांच्या या ‘भेडिया’साठी चांगलेच उत्सुक आहेत.

दिग्दर्शक अमर कौशिक यांचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी त्यांनी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ आणि आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना उदंड प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.