अभिनेता अजय देवगण सध्या खूप चर्चेत आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम २’ १८ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. २०१४ साली आलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा हा पुढील भाग असणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगली उत्सुकता लगावून राहिली आहे. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता वाढवण्यासाठी या चित्रपटाची टीम वेळोवेळी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काही ना काही अपडेट्स देत असते. आता ‘दृश्यम २’ संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एसीपी प्रद्युमन यांच्या सीआयडी टीमची ‘दृश्यम २’ मध्ये एंट्री होणार आहे.

गेली अनेक वर्ष छोट्या पडद्यावरील अत्यंत नावाजलेला कार्यक्रम म्हणून ‘सीआयडी’ची ओळख आहे. गेले काही महिने हा कार्यक्रम बंद होता. आता या चित्रपटाद्वारे ‘सीआयडी’ची लोकप्रिय टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एसीपी प्रद्युमन यांची टीम चित्रपटातील केसच्या विशेष तपासाचा भाग असेल. ही टीम आय.जी मीराला मदत करताना दिसणार आहे.

आणखी वाचा : अखेर कोडं सुटलं! विवेक अग्निहोत्री उलगडणार करोना वॅक्सिन निर्मितीमागील गोष्ट; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

परंतु ही सगळीजण जास्त वेळ चित्रपटात दिसणार नाहीत, तर या चित्रपटात ते पाहुण्या कलाकाराचा भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत आणि इन्स्पेक्टर दयासोबत एका चौकशी कक्षात काम करताना दिसत आहेत.

‘दृश्यम २’ चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण व्यतिरिक्त श्रिया सरन आणि इशिता देखील, अक्षय खन्ना हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर मृणाल जाधव अजयच्या लहान मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या पहिल्या भागाची कथा सिक्वेलमध्ये पुढे नेण्यात आली आहे.

हेही वाचा : “इन्स्पेक्टर मीरा देशमुख हे पात्र लिहिणाऱ्यांना…” तब्बूने केले ‘दृश्यम २’मधील भूमिकेमागचे गुपित उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात सात वर्षानंतरही पोलीस आय.जी. मीरा देशमुखच्या मुलाचा, सॅमचा शोध घेत असल्याचे दिसून आले. या प्रकरणावरुन पोलिसांनी अजूनही साळगावकर परिवारावर नजर ठेवत असल्याचे दिसून आले. दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनामुळे दिग्दर्शनाची धुरा अभिषेक पाठक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.