शाहरुख खान व दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरुन वादंग सुरू आहे. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करुन रोमान्स केल्यामुळे ‘बेशरम रंग’ गाण्यावरुन वाद सुरू झाला. त्यामुळे ‘पठाण’ चित्रपट बॉयकॉटच्या ट्रेण्डमध्येही अडकला आहे.

‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अक्शन सीन्स व दीपिकाच्या बोल्डनेसची झलक पठाणच्या ट्रेलरमध्ये दिसली. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. अवघ्या तासाभरातच या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले. ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या दीपिकाला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

हेही वाचा>>आर्यन खानला डेट करण्याच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली “तो खूप…”

हेही वाचा>> ‘बिग बॉस मराठी ४’चा विजेता कोण ठरणार, हे अमृता धोंगडेला आधीच माहीत होतं; म्हणाली…

दीपिकाचा विमानतळावरील व्हिडीओ एका पापाराझी अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी दीपिकाचे फोटो काढताना दिसत आहेत. दीपिका पापाराझींना “ट्रेलर पाहिला की नाही?”, असा प्रश्न विचारत आहे. यावर पापाराझींनी “खूप वेळा पाहिला”, असं उत्तर दिल्याचं व्हिडीओत दिसत आहेत. दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>>“तू पुरुष आहेस का?”, ‘बिग बॉस’च्या घरात फराह खानचा साजिदला सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिका पदुकोण व शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. देशभक्तीवर आधारित असलेल्या या चित्रपटात जॉन अब्राहम नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.