बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. कमाईमध्ये या चित्रपटाने आत्तापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुखबरोबर या चित्रपटात साऊथची तगडी स्टारकास्ट आहे. दीपिका पदुकोणने ‘जवान’मधून कॅमिओ केलं आहे. या कॅमिओसाठी दीपिकाने मोठी रक्कम आकारल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- धर्मेंद्र यांच्यानंतर आता हेमा मालिनीही चित्रपटांमध्ये करणार कमबॅक? ईशा देओलने केला खुलासा, म्हणाली…

दीपिका आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने १ हजार कोटीपेक्षा जास्तीचा व्यवसाय केला होता. जवानच्या यशानंतर आता दीपिकाने ‘जवान’मधून कॅमिओ केलं आहे. दीपिकाने या कॅमिओसाठी १५ कोटी रुपये घेतल्याच्या चर्चा आहेत. आता या चर्चांवर मौन सोडत खुद्द दीपिकाने याबाबत खुलासा केला आहे.

अलीकडेच ‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने जवामधील कॅमिओसाठी किती फी घेतली याबाबतचा खुलासा केला आहे. दीपिका म्हणाली, की, ‘मी जवानासाठी एक रुपयाही फी घेतली नाही. याआधीही मी रणवीरच्या ८३ आणि रोहित शेट्टीच्या सर्कससाठीही काहीही शुल्क घेतले नव्हते. ‘मला ८३ चा भाग व्हायचे होते. कारण मला त्या महिलांना श्रद्धांजली वाहायची होती ज्यांनी त्यांच्या पतींना पाठिंबा देण्यासाठी स्वतःशी तडजोड केली. तसेच मी शाहरुख खान आणि रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये स्पेशल अपिअरन्ससाठी नेहमीच हजर असते.”

हेही वाचा- “इतिहासजमा”, डबल डेकर बसच्या अखेरच्या दिवशी सेलिब्रिटी भावुक; म्हणाले, “मुंबईकरांसाठी ही बस नाही तर…”

दीपिकानेही शाहरुख खानसोबतच्या तिच्या बॉन्डबद्दलही भाष्य केलं आहे ती म्हणाली. “आम्ही दोघे एकमेकांचे लकी चार्म आहोत. पण आमचं नात या सगळ्याच्या वर आहे. आमचा एकमेकांवर विश्वास आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवानच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत या चित्रपटाने ३४५.५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या पाच दिवसांतच चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. मात्र, सहाव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून आलं आहे. सहाव्या दिवशी या चित्रपटाने ६.५० कोटी रुपयांची अंदाजे कमाई केली आहे.