अभिनेता देवदत्त नागे याने मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘तान्हाजी’ या चित्रपटातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. तर सध्या तो त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. आता या चित्रपटामध्ये प्रभास आणि सैफ अली खान यांच्याबरोबर काम करण्याचा त्याचा अनुभव कसा होता हे त्याने शेअर केलं आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात देवदत्त हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून देवदत्तचं या चित्रपटातील काम जबरदस्तच असणार आहे, याची प्रेक्षकांना खात्री पटली आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, असं त्याने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. आता या चित्रपटात काम करण्याचा त्याचा अनुभव कसा होता हे त्याने ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आणखी वाचा : “देवदत्त नागे वैयक्तिक आयुष्यात माझा भाचा आहे आणि मी त्याची मावशी…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा; पोस्ट चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Devdatta Gajanan Nage (@devdatta.g.nage)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवदत्त म्हणाला, “‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी ओम राऊत यांनी मला विचारलं होतं. त्या वेळी क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला. सैफ अली खानबरोबर याआधी मी ‘तान्हाजी’ चित्रपटात काम केलं होतं, त्यामुळे या चित्रपटात पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करताना आपलेपणा अधिक वाटत होता. तर दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभवही अविस्मरणीय होता. चित्रपटाच्या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान कुठेही प्रभास आणि सैफ अली खान यांनी आपण सुपरस्टार आहोत असा आव आणला नाही, त्यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

दरम्यान, ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.