बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ चित्रपट चांगलाच हिट झाला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण स्टारर ‘दृश्यम २’ ची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. २०१५ साली या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन निशिकांत कामत याने केले होते. परंतु २०२० साली निशिकांतचे निधन झाले. त्यामुळे ‘दृश्यम २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अजय देवगण आणि तब्बू निशिकांतच्या आठवणीत भावूक झाले.

आणखी वाचा : “इन्स्पेक्टर मीरा देशमुख हे पात्र लिहिणाऱ्यांना…” तब्बूने केले ‘दृश्यम २’मधील भूमिकेमागचे गुपित उघड

आज गोव्यात या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना ‘दृश्यम’चा दिग्दर्शक निशिकांत कामत याचाही उल्लेख करत अजय देवगण त्याच्याबद्दल भरभरून बोलला. अजय म्हणाला, “मला आजच्या दिवशी निशिकांतची आठवण येत आहे. त्याच्याशिवाय हे शक्य झाले नसते.” अजय पाठोपाठ तब्बूनेही त्याची आठवण काढली. ती म्हणाली, “निशीने पहिल्या भागाचा अनुभव अगदी सोपा करून दिला.”

कार्यक्रमादरम्यान अजय देवगणला निशिकांतच्या कामाबद्दल आणि त्याच्याशी संबंधित आठवणींबद्दल विचारले असता तो म्हणाला, “मी त्याच्याबद्दल जास्त बोलू शकणार नाही. त्यांच्याबद्दल कितीही बोललं, त्याचं कितीही कौतुक केलं तरी ते पुरेसं ठरणार नाही. आपण सगळेच त्याला मिस करत आहोत. आज जर तो इथे असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता.”

हेही वाचा : तब्बूने अजय देवगणसाठी केलेल्या खास पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, म्हणाली….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामतने केलं होतं. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ६७.१७ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन अभिषेक पाठकने केले आहे.