बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘टायगर ३’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद दिला असून सलमानचे चाहते त्याच्या या दमदार कमबॅकची आतुरतेने वाट बघत आहेत. यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा भाग हा चित्रपट असणार आहे. ‘एक था टायगर’ या २०१२ मध्ये आलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खानने केलं होतं.

या सीरिजमधला ‘टायगर ३’ हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या चित्रपटानंतर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर याने केलं होतं. आता ‘टायगर ३’चं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार आहे. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर कबीर खान पुन्हा या सीरिजकडे वळला नाही. नुकतंच कबीर खान यांनी ‘न्यूज १८’शी चर्चा करताना त्याला ‘टायगर ३’ची चिंता वाटते असं वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘बॉबी देओलबरोबर ‘जब वी मेट’ का केला नाही? दिग्दर्शक इम्तियाज अलीने सांगितलं खरं कारण

कबीर खान म्हणाला, “एक था टायगर हे पात्र मी रचलं आहे त्यामुळे अजूनही या सीरिजशी जोडलेलो असल्याची भावना माझ्या मनात आहे. मला आजही या चित्रपटाचा अभिमान आहे. ‘टायगर ३’ प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट माझा नसला तरी इतरांप्रमाणेच मी पण यासाठी खूप उत्सुक आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होतोय अन् मी प्रेक्षकांबरोबर बसून टाळ्या शिट्या वाजवत तो पाहण्यास उत्सुक आहे. यश राज फिल्म्स हे माझं दुसरं घरच आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच कबीर खान यश राजच्या ‘स्पाय युनिव्हर्स’साठीही खूप उत्सुक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या कबीर खान त्याच्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटावर काम करत आहे. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून नुकताच यातील एक वॉर सीन शूट झाला आहे. नुकताच या चित्रपटातील कार्तिक आर्यनचा लूकसुद्धा समोर आला होता.