शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावर अनेक जण टीका करत असतानाच दुसरीकडे शाहरुखचे चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुकता दर्शवत आहेत. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अनेकांना पहिल्या शोची तिकिटं मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता एका चाहत्याने थेट शाहरुखकडे धाव घेत त्याला फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटं मिळवून देण्याची मागणी केली.

शाहरुखने ट्विटरवर नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली. यावेळी एकाने चक्क शाहरुख खानलाच चित्रपटाच्या पहिल्या शोची तिकिटं मिळवण्यासाठी मदत मागितली.

आणखी वाचा : “आमच्या मुलीचं नाव तू ठेव,” चाहत्याच्या मागणीवर शाहरुख खानने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाला…

एका चाहत्याने ट्वीट करत शाहरुखला लिहिलं, ” बुक माय शोची साईट क्रॅश झाली आहे. तू मला दोन तिकीट मिळवून दे म्हणजे मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघू शकेन.” त्याच्या या मागणीवर शाहरुखनेही भन्नाट उत्तर दिलं. तो म्हणाला, “नाही. तिकिटं तर तुझी तुलाच मिळवावी लागतील. क्रॅश किंवा नो क्रॅश.” शाहरुख खानने दिलेलं हे भन्नाट उत्तर सर्वांनाच आवडलं असून यावर त्याचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : Video: “नाही, मी तर…” शाहरुखला ‘तृतीयपंथी’ म्हणणाऱ्याला किंग खानचं सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘पठाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.