गणेशोत्सवादरम्यान फराह खान लालबागचा राजाच्या दर्शनाला गेली होती. तिने गर्दीत रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर तिचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये तिला तिच्या मैत्रिणी हात पकडून नेताना दिसत होत्या. पण तिथे फार गर्दी नव्हती तरी ती मैत्रिणींच्या मदतीने चालत होती. त्यामुळे फराहला नेमकं काय झालंय, असं कमेंटमध्ये नेटकरी विचार होते. त्यावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.

“मी नकार दिल्यावर सहनिर्मात्याने…”, इशा गुप्ताने सांगितले कास्टिंग काउचचे धक्कादायक अनुभव; म्हणाली, “दोघे जण…”

यंदाच्या गणेशोत्सवात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला आशीर्वाद घेण्यासाठी गेले. अगदी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरपासून ते विकी कौशल, ऐश्वर्या राय, सोनू सूद, शेखर सुमन, कार्तिक आर्यन, रणधीर कपूर, बबीता कपूर, रेमो डिसुझा व त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा या यादीत समावेश आहे. दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक फराह खानही बाप्पाच्या दर्शनाला गेली होती. पण एका व्हिडीओत ज्याप्रकारे गर्दी नसलेल्या रस्त्यावर ती मैत्रिणींच्या मदतीने चालत होती. आता फराहने कमेंट करत तिथल्या गर्दीबद्दल भाष्य केलंय.

“तिथे खूप गर्दी होती. मला फक्त शांततेत दर्शन घ्यायचे होते. त्यादिवशी खूप जण गर्दीत धक्के देत होते, ढकलत होते, पण आता मी पूर्णपणे ठिक आहे,” असं फराहने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Farah Khan Kundar
फराह खानची कमेंट

दरम्यान, गर्दीत अडकल्यामुळे फराह खानला त्रास झाला होता. पण आता ती पूर्णपणे ठिक आहे, असं तिने म्हटलं आहे. यंदा लालबागचा राजाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अभिनेता विकी कौशलही गर्दीत अडकला होता. त्याला पोलिसांनी गर्दीतून बाहेर पडण्यास मदत केली होती.