Fighter box office collection day 10: हृतिक रोशन व दीपिका पदुकोणचा एरिअल अ‍ॅक्शन चित्रपट ‘फायटर’ २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जबरदस्त कमाई केली. पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचं कलेक्शन ‘फायटर’ने केलं. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत घसरण होताना पाहायला मिळाली. पण अशातच दुसऱ्या शनिवारी ‘फायटर’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्याचं पाहायला मिळालं.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ने दुसऱ्या शनिवारी बक्कळ कमाई केली. पहिल्या शनिवारच्या तुलनेत दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘फायटर’ने दुसऱ्या शनिवारी १०.५ कोटींचं कलेक्शन जमवलं. तर शुक्रवारी चित्रपटाने ५.७५ कोटींचा कमाई केली होती. आतापर्यंत भारतात ‘फायटर’ने एकूण मिळून १६२.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा – ऐका दाजीबा! अवधूत गुप्तेच्या सुपरहिट गाण्याला २१ वर्षे पूर्ण, गायकाने शेअर केला खास डान्स व्हिडीओ

जागतिक पातळीबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ‘फायटर’ ३०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. जगभरात हृतिक, दीपिकाच्या या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर २६१ कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट हृतिक रोशनच्या करिअरमधला सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

हेही वाचा – “कुणीच इतक्या खालच्या थराला…” पूनम पांडेविरोधात FIR दाखल करण्याची ‘सिने वर्कर्स असोसिएशन’ची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘फायटर’ चित्रपटाची कथा भारतीय हवाई दलातील शूर सैनिकांच्या जीवनावर आधारित आहे. पुलवामा हल्ला व बालाकोट स्ट्राइकच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानिया व दीपिका मीनल राठोडच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच अनिल कपूर कॅप्टन राकेश जयसिंह यांच्या भूमिकेत झळकले आहेत.