Shahrukh Khan Properties: शाहरुख खान भारतातील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनेता असण्याबरोबरच तो व्यावसायिकही आहे. त्याची चित्रपट निर्मिती कंपनी आहे. तसेच तो आयपीएलमधील कोलकाता नाइट राइडर्स संघाचा मालकदेखील आहे.
२०२५ मधील हुरुन रीच लीस्ट काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली. या यादीत बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंतांच्या कलाकारांच्या यादीत शाहरुख खानचे नाव पहिल्या स्थानी आहे. इतकेच नाही तर यावर्षी त्याचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे. त्याची संपत्ती १.४ अब्ज इतकी आहे. शाहरुख खानची विविध ठिकाणी महागडी घरेदेखील आहेत. ती कोणकोणत्या शहरात आहेत हे जाणून घेऊयात…
मुंबई
मुंबईतील शाहरुखच्या बंगल्याचे नाव मन्नत असे आहे. या सी-फेसिंग बंगल्याची कायमच चर्चा होताना दिसते. पांढऱ्या रंगाचा सहा मजल्यांचा हा बंगला लक्षवेधी आहे. हिंदुस्तान टाइम्सनुसार या बंगल्याची किंमत २०० कोटी इतकी आहे. मुंबईतील सर्वात महागड्या घरांपैकी एक मन्नत आहे.
अलिबाग
शाहरुख खानचे हॉलीडे होम हे महाराष्ट्रातील अलिबागमध्ये आहे. या बंगल्यात अभिनेता त्याचा वाढदिवस किंवा नवीन वर्षाची पार्टी यांसारखे क्षण त्याच्या जवळच्या मित्रांसह साजरे करतो. यामध्ये स्वीमिंग पूल, तसेच प्रायव्हेट हेलिपॅड आहे. फर्स्ट पोस्टनुसार, शाहरुख खानने ही मालमत्ता १४.६७ कोटींना विकत घेतली होती.
दिल्ली
शाहरुख गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहे. मात्र, तो मूळचा दिल्लीचा आहे. दिल्लीतील पंचशील पार्कजवळ अभिनेत्याचे घर आहे. ही त्याची वडिलोपार्जित संपत्ती आहे. इथे अभिनेत्याच्या अनेक आठवणी आहेत.
लंडन
शाहरुख खानची मालमत्ता फक्त भारतातच नाही, तर परदेशातदेखील आहे. लंडनमध्ये अभिनेत्याचे आलिशान अपार्टमेंट आहे. असे म्हटले जाते की अभिनेत्याच्या या अपार्टमेंटची किंमत १७५ कोटी इतकी आहे. याबरोबरच त्याची लॉस एंजेलिसमध्येदेखील एक प्रॉपर्टी आहे. शाहरुख अनेकदा त्याच्या कुटुंबासह सुट्ट्यांसाठी त्याच्या लंडनच्या घरी जातो.
दुबई
शाहरुख खानने दुबईतदेखील मालमत्ता खरेदी केली आहे. त्याचा बंगला सर्व सोयीसुविंधायुक्त आहे. या बंगल्यामध्ये ६ बेडरुम, दोन रिमोट कंट्रोल गॅरेज आणि एक पूल आहे. या बंगल्याची किंमत १०० कोटी इतकी आहे. याचे नाव जन्नत असे आहे.