कार्तिक आर्यनच्या आधी वरुण धवनला झाली होती 'हेरा फेरी ३'ची विचारणा, पण 'या' कारणामुळे अभिनेत्याने दिला नकार | Hera pheri 3 producers had approached to varun dhawan before giving offer to kartik aaryan | Loksatta

कार्तिक आर्यनच्या आधी वरुण धवनला झाली होती ‘हेरा फेरी ३’ची विचारणा, पण ‘या’ कारणामुळे अभिनेत्याने नाकारली ऑफर

अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यनला या चित्रपटात कास्ट केल्याने प्रेक्षक नाराज आहेत.

कार्तिक आर्यनच्या आधी वरुण धवनला झाली होती ‘हेरा फेरी ३’ची विचारणा, पण ‘या’ कारणामुळे अभिनेत्याने नाकारली ऑफर

‘हेरा फेरी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा चित्रपट अनेकजण आवर्जून बघतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केलं होतं. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यनला या चित्रपटात कास्ट केल्याने आधीच प्रेक्षक नाराज आहेत. पण कार्तिक आर्यनच्या आधी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी अभिनेता वरुण धवनला विचारणा केली असल्याचं समोर आलं आहे.

एका मिडीया रिपोर्टनुसार, अभिनेता वरुण धवन याने या चित्रपटात ‘राजू’ची भूमिका साकारावी अशी या चित्रपटाच्या निर्मात्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित आणि फिरोज नाडियादवाला यांनी कार्तिक आर्यनच्या आधी वरुण धवन ला या भूमिकेसाठी विचारलं होतं. परंतु त्याने या चित्रपटाला नकार दिला.

आणखी वाचा : गश्मीर महाजनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार प्रमुख भूमिकेत

वरुणला अक्षय कुमारबद्दल अत्यंत आदर वाटतो. त्यामुळे फिरोज नाडियाडवाला आणि अक्षय कुमार यांच्यातल्या मतभेदांचा वरुणला फायदा घ्यायचा नव्हता. राजूची भूमिका अक्षय कुमारच उत्कृष्ट प्रकारे निभावू शकतो असं कारण देत त्याने या चित्रपटाला नकार दिला होता असं समोर आलं आहे. फक्त वरुणच नाही तर त्याचे वडील डेव्हिड धवन यांनीही या चित्रपटाची एक ऑफर नाकारली आहे.

हेही वाचा : करण जोहरने विकी कौशलला दिली ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’ची ऑफर, अभिनेता म्हणाला…

अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’मधून बाहेर पडल्याने सगळेच चाहते चांगले नाराज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान आपल्याला काही गोष्ट पटल्या नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडल्याचं अक्षयने कबूल केलं होतं. तसंच त्याने प्रेक्षकांची त्याबद्दल माफीही मागितली होती. पण परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्याबरोबरच अक्षय कुमारही हवाच अशी चाहत्यांनी मागणी केली आहे. या तिघांशिवाय हा चित्रपट बनूच शकत नाही आणि बनला तरी तो आम्ही बघणार नाही असा पवित्रा प्रेक्षकांनी घेतला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 11:30 IST
Next Story
Video : रात्रीच मरीन ड्राईव्हला जाऊन बसली महेश मांजरेकरांची लेक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली…