यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घौडदौड कायम पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरील या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ७ गडी राखून विजय मिळवला आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दणदणीत षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याबरोबरच त्याने भारताच्या विजयाबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधील ४८ वा शतकही झळकवले. त्याच्या या कामगिरीनंतर त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने एक पोस्ट शेअर केली.

अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ९७ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे ४८ वे शतक आहे. विराटच्या कामगिरीनंतर अनुष्काने इंडियन क्रिकेट टीमची एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : IND vs BAN: ‘चेज मास्टर’ विराट कोहलीने झळकावले ४८वे शतक, भारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय

या पोस्टमध्ये टीम इंडियाने विराट कोहलीचे कौतुक केले आहे. अनुष्काने हीच पोस्ट शेअर केली आहे. त्याबरोबर तिने हार्ट आणि किस करतानाचा एक इमोजी शेअर केला आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

anushka sharma post
अनुष्का शर्माची पोस्ट

दरम्यान भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी २५६ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची पार्टनरशिप केली.

आणखी वाचा : “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात रोहित शर्मा हा ४८ धावा करुन बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल ५३ धावा, श्रेयस अय्यर १९ धावा करत पॅव्हेलिअनमध्ये परतले. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने आणखी पडझड होऊ न देता धावांचा डोंगर रचला. विराट कोहलीने ९७ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या. तर केएल राहुलने ३४ चेंडूत ३४ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे ४८ वे शतक आहे.