गेल्या काही वर्षात बॉलिवूडमधील स्टारकिड्स हा एक चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांच्या मुलांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं. यात काही जणांना यश आलं तर काहीजण अपयशी ठरताना दिसत आहेत. आई-वडिलांमुळे त्यांना चित्रपटांमध्ये काम करताना प्राधान्य दिलं जातं असं अनेकदा बोललं जातं. आता अभिनेत्री जानवी कपूरने याबद्दल मत व्यक्त केलं आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिने ‘धडक’ या करण जोहर निर्मित चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं. त्यानंतरही तिने ‘गुंजन सॅक्सेना’, ‘रुही’, ‘गुड लक जेरी’, ‘मिली’ अशा विविध चित्रपटातून कामं केली. परंतु तिचे हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करू शकले नाहीत. प्रमाणे तिच्या अभिनयावरूनही तिला अनेकदा टोल केलं जातं. याबाबत आपलं मत व्यक्त करत तिने स्टारकिड असल्याचा तिला फायदा नाही तर नुकसान झालं आहे असं म्हटलं आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा देताना कंगना रणौतने पुन्हा एकदा साधला आलिया-रणबीरवर निशाणा? म्हणाली, “त्यांनी कधीही…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या करिअरबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, “मी जेव्हा एखाद्या चित्रपटावर मेहनत घेत असते तेव्हा मला अनेक मानसिक त्रासातून जावं लागतं. कोणी माझ्या कामावर संशय घेतं, तर कोणी सोशल मीडियावर मला ‘नेपोटिझम की बच्ची…’ अशी कमेंट करतं. लोकांना असं वाटतं की मला सगळं सहज मिळतं. पण तसं अजिबात नाही. मी नेहमीच मेहनतीला प्राधान्य देते. मला नक्की काय करायचं हे माझ्या डोक्यात स्पष्ट असतं. मला माझ्या आईचा वारसा पुढे न्यायचा आहे.”

हेही वाचा : श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांच्यात केल्या जाणाऱ्या तुलनेवर बोनी कपूर यांनी सोडले मौन, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “कदाचित मला काही संधी सहज मिळाला असतील पण याने मला नुकसानच झालं आहे. प्रेक्षक माझा चित्रपट तटस्थपणे बघायला जात नाहीत. जे लोक माझ्या मेहनतीकडे फारसं लक्ष देत नाहीत त्यांना मी एकच सांगू इच्छिते की ही प्रत्येक भूमिका खूप मेहनत घेऊन साकारते. आतापर्यंत मला जे मिळाला आहे याची मला जाण आहे. माझ्या मनात चित्रपटांबद्दल प्रेम आहे. मी जे काम करते त्याचा मला समाधान आहे कारण मला माहित आहे की मी जे करते ते चांगलं आहे.” आता जान्हवी कपूरचं हे बोलणं चांगलंच चर्चेत आलं आहे.