Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: सध्या सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. १ मार्चपासून सुरू झालेला हा कार्यक्रम ३ मार्चपर्यंत असणार आहे. तीन दिवसांच्या या कार्यक्रमासाठी हॉलीवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत सेलिब्रिटी उपस्थित राहिले आहेत. याशिवाय उद्योग क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी देखील हजेरी लावली आहे. याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच अभिनेत्री जान्हवी कपूरने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात जबरदस्त परफॉर्मन्स रिहानाने केला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. अशात जान्हवी कपूरने रिहानासह ‘झिंगाट’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

Shocking video 9 year old girl going to school was attacked by a pitbull dog
VIDEO: भयंकर! चिमुकला अंगणात खेळत होता; इतक्यात पिटबुल कुत्रा आला अन्..आधी हल्ला, मग ओढून नेलं
rohit sharma gets emotional as he opens up on 2023
Video : वर्ल्डकपची आठवण काढताच रोहित शर्मा झाला भावुक, कपिल शर्माच्या शोमध्ये म्हणाला, “मी आणि विराटने…”
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित
When Russian Girl Came To Meet Dolly Chaiwala and request him in bill gates style one chai please
रशियन मुलीला पडली डॉलीच्या चहाची भूरळ, बिल गेट्सच्या स्टाइलमध्ये म्हणाली “वन चाय प्लीज”; पाहा Video

हेही वाचा – महेश मांजरेकरांना वाटतं ‘हे’ असावं स्वतःच्या जीवनपटाचं नाव, म्हणाले…

या व्हिडीओत, ‘झिंगाट’ गाण्यावर जान्हवी रिहाना जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत. या दोघींच्या मागे अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट देखील ‘झिंगाट’वर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “This woman is a goddess. stop it goodbye.” हा व्हिडीओ काही तासांत तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी आईच्या आठवणीत झाले भावुक, म्हणाले, “पंधरा वर्षे झाली…”

दरम्यान, गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा झाला होता. माहितीनुसार, १२ जुलैला अनंत व राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा होणार आहे.