श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर आता तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड क्षेत्रात आपलं स्थान टिकवून आहे. जान्हवी लहाणपणापासून लाडाकोडात वाढली. आई-वडिलांमुळे प्रत्येक गोष्ट तिला अगदी सहजरीत्या मिळाली आहे. पण, या सगळ्या गोष्टींबरोबरच तिला अनेकदा वाईट अनुभवदेखील आले आहेत.

चित्रपट निर्माते करण जोहर यांना नुकतीच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत जान्हवीने तिची एक वाईट आठवण सांगितली. अभिनेत्री जेव्हा १२-१३ वर्षांची होती तेव्हा ती तिची आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांच्याबरोबर एका कार्यक्रमाला गेली होती. त्यानंतर अचानक तिचे फोटो एका अश्लील साईटवर झळकले होते.

हेही वाचा… “माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी…”, घटस्फोट घेतल्यानंतर शर्मिष्ठा राऊतची झाली होती ‘अशी’ अवस्था, अभिनेत्री म्हणाली…

धर्मा प्रॉडक्शन्सच्या यूट्यूब चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडीओत जान्हवी म्हणाली, “जेव्हा पहिल्यांदा मी मीडियाद्वारे लैगिंक हिंसा अनुभवली तेव्हा मी १२-१३ वर्षांची होते. मी आई आणि वडिलांबरोबर एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि त्यानंतर माझे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते. तेव्हा इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियाची क्रेझ नुकतीच वाढू लागली होती. आणि तेव्हा माझे फोटो पोर्नोग्राफिक साइटसारख्या एका वेबसाइटवर मला दिसले. त्या वेळेस शाळेतली मुलं माझ्याकडे बघून हसायची.”

जान्हवी पुढे म्हणाली, “मी हे वारंवार सांगत असते. कारण- मला वाटतं की मी जिथून आले आहे; त्याबद्दल मी खूप दिलगीर आहे आणि या सगळ्या गोष्टींवर मात करणंदेखील माझ्यासाठी तितकंच आवश्यक आहे. मला खात्री आहे की, इतर लोकांनादेखील थोड्या वेगळ्या पद्धतीनं; पण असेच अनुभव आले असतील. आणि ते अधिक वास्तविक आणि भयावहदेखील असतील.”

हेही वाचा… घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेवर भारत गणेशपुरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आपल्याकडे राजकीय पक्षांचे…”

“मला एका विशिष्ट पद्धतीने कपडे घालायला आवडतात आणि मी अशा घरात लहानाची मोठी झालीय; जिथे मला कोणीही अडवलं नाहीय किंवा मी जे काही परिधान करतेय, त्यावरून माझी पारख केली गेलीय. पण मला हेदेखील माहीत आहे की, प्रत्येक मुलगी ही तिच्या चारित्र्याबद्दल खूप भावनिक असते आणि जेव्हा ती एका विशिष्ट प्रकारे कपडे परिधान करते तेव्हा काही जण तिच्या चारित्र्यावर संशय घेतात,” असंही जान्हवी म्हणाली.

हेही वाचा… “आई तू कुठे आहेस”, राखी सावंतवर होणार शस्त्रक्रिया; अभिनेत्रीला कठीण काळात येतेय आईची आठवण, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

जान्हवीच्या म्हणण्यानुसार- कोणीही तिला ती अशीच आहे किंवा तशीच आहे, असं समजू नये. लोकांनी तिला गांभीर्यानं घेतलं पाहिजे, असं तिला वाटतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जान्हवी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. शरण शर्मा दिग्दर्शित ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.