Javed Akhtar Reacts On Sardaar Ji 3 : आपल्या गायन आणि अभिनयामुळं चर्चेत असलेला अभिनेता दिलजीत दोसांझ एका वादात अडकला आहे. दिलजीतच्या आगामी ‘सरदार जी ३’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘सरदारजी ३’चा ट्रेलर प्रदर्शित होताच दिलजीत दोसांझ पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर काम करत असल्याने कलाकारांसह नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत.

‘सरदार जी ३’ या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली आहे. अशातच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी या चित्रपटाबद्दल दिलजीतला पाठिंबा दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसनुसार जावेद अख्तर याप्रकरणी म्हणाले, “मला माहित नाही की चित्रपट नेमका कधी बनवला गेला आहे. पण जर दहशतवादी हल्ला होण्यापूर्वी चित्रपट पूर्ण झाला असेल; तर तो गरीब निर्माता काय करणार? नंतर काय होणार आहे, हे त्याला तेव्हा कसं कळणार होतं?”

यापुढे ते म्हणाले, “या चित्रपटामुळे भारतीय निर्मात्यांचे पैसे बुडतील, पाकिस्तानचे नाही. भारतीय निर्मात्याला तोटा होईल. एखादा कायदा दहा वर्षांपूर्वीच्या परिस्थितीला लागू करू शकत नाही. जर त्या गरीब माणसाला असे काही घडणार आहे हे माहित असतं, तर त्याने पाकिस्तानी अभिनेत्रीची चित्रपटासाठी निवड केलीच नसती. मला वाटतं की, सरकार आणि सेन्सॉर बोर्डाने या प्रकरणाकडे सहानुभूतीने पाहावं.”

दिलजीत दोसांझ इन्स्टाग्राम पोस्ट

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, इम्तियाज अली यांनी असं म्हटलं, “मी या विषयावर जास्त काही सांगू शकत नाही. पण मी दिलजीतला वैयक्तिकरित्या ओळखतो आणि मला माहित आहे की, त्याला देशभक्तीची जाणीव आहे. तुम्ही त्याच्या कार्यक्रमांत पाहिलं असेल, तर तो नेहमीच भारतीय ध्वज फडकावत शेवट करतो आणि हे तो मनापासून करतो. यात कोणताही आविर्भाव नाही. त्याला हे सर्व करण्यास कोणीही सांगितलं नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे इम्तियाज अली म्हणतात, “त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात तो अभिमानाने भारताचे नाव घेतो. आता मला कास्टिंगबद्दल नीट माहिती नाही. कारण सहसा कलाकार कास्टिंगबद्दलचे निर्णय घेत नाहीत. पण मला हे माहित आहे की, दिलजीतला आपल्या देशाबद्दल खूप प्रेम आहे.” दरम्यान, ‘सरदार जी ३’ चे निर्मात्यांनीही एनडीटीव्हीला सांगितले होते की, पहलगाम हल्ल्यापूर्वीच हा चित्रपट चित्रित करण्यात आला होता आणि त्यावेळी अशी कोणतीही बंदी नव्हती.