समाजातील महिलांना अनेकदा पुरुषांच्या वाईट आणि अश्लील कृत्यांचा सामना करावा लागतो. बस, ट्रेन, प्रवासात तसंच कामाच्या ठिकाणी महिला पुरुषांच्या वाईट कृत्याच्या बळी ठरतात. केवळ महिलाच नाही तर लहान किशोरवयीन मुलींबरोबरही असे प्रकार होताना दिसतात आणि याला कोणताच समाज घटक अपवाद नाही. कारण मध्यमवयीन किंवा गरीब घटकातील मुलींबरोबरच हे घडत नाही तर सेलिब्रिटींबरोबरदेखील घडतं.

बॉलीवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हरलाही अशा काही वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला होता. स्वत: जिमीने याबद्दल सांगितलं आहे. लहानपणी तिला बस किंवा ट्रेनमधून प्रवास करत असताना पुरुषांच्या वाईट नजरेचा सामना करावा लागला होता. याबद्दल स्वत: जिमीने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. हॉल्टरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं.

यावेळी जिमी असं म्हणाली, “मी बस, ट्रेनमधून प्रवास केला आहे. अंधेरीत राहायचे तर तिथून बसने स्टेशनला जायचे. मग ट्रेनने चर्चगेटला पोहोचायचे. बसमधून प्रवास करताना अनेकदा मुलं मागून स्पर्श करायचे आणि हे असं खूपदा झालं आहे. एकदा एक मुलगा मला छेडत होता आणि मला ते खूप त्रासदायक वाटलं होतं. तेव्हा मी खूप भित्री होती. त्यामुळे मला सतत ते टेन्शन असायचं की मी कसा प्रवास करु वगैरे वगैरे…”

यानंतर जिमी म्हणाली, “मला माझ्या एका मैत्रीणीने सांगितलं होतं की, बसमध्ये प्रवास करताना कोपरे मारायचे. कुणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कोपऱ्यानेच मारायचं. हे असं ट्रेनमध्ये झालं आहे. इतकंच काय तर शाळेत सुद्धा असं झालं आहे. वार्षिक स्नेहसंमेलन होतं. तेव्हा मी रिहर्सल करून आले. ड्रायव्हरने मला सांगितलं की, तू गाडीत जाऊन बस तर मी गाडीत मागे बसून मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारत होतो.”

यानंतर जिमीने सांगितलं, “आम्ही गप्पा मारत असताना एक मुलगा आला आणि तो दरवाज्याच्या मागे उभा राहून वाईट कृत्य करु लागला. तेव्हा मला माझ्याबरोबर काय होत आहे हे कळलंच नाही. मी तेव्हा फक्त थरथर कापत होते. कारण त्याने गाडीचा दरवाजा उघडून काही केलं तर याची मला भिती वाटतं होती. तेव्हा माझी मैत्रीण मला बोलली की, तु माझ्याशी बोलत राहा. मग मी हळूच गाडीचे सगळे दरवाजे बंद केले. मग तो निघून गेला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर तिने सांगितलं, “आमच्या शाळेच्या बसमधला व्यक्तीनेसुद्धा अनेकदा वाईट कृत्य केलं होतं. तो चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. आता काही गोष्टी बदलल्या आहेत. आता पुरुषांबरोबरच महिलादेखील बसमध्ये असतात. तेव्हा याविरुद्ध आवाज उठवण्याची माझी कधी हिंमतच झाली नाही. पण आता याबद्दल बोलण्यात किंवा कृती करण्याची हिंमत माझ्यामध्ये आली आहे असं मी म्हणेन.”