अभिनेत्री काजोल बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. काजोल आता फारशी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती खूपच सक्रिय असते. चाहत्यांबरोबर ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी शेअर करताना दिसते. काही महिन्यांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने ट्रोलिंग ही सोशल मीडियावरील सर्वात विचित्र गोष्ट असल्याचं म्हटलं होतं. तसेच अशा ट्रोलिंगला ती स्वतः अजिबात गांभीर्याने घेत नसल्याचंही म्हटलं होतं. आता त्वचेच्या रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलने सडेतोड उत्तर दिलं आहे.

काजोल नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करताना दिसते. पण त्यावरून तिला ट्रोल केलं जातं. तिने त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी कोणती ट्रीटमेंट केली आहे का? असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. अर्थात याआधी दिलेल्या मुलाखतीमध्ये काजोलने गोरं होण्यासाठी कोणतीही ट्रीटमेंट घेतली नसल्याचं तसेच त्वचेचा सावळा रंग हा टॅनिंगमुळे असल्याचं म्हटलं होतं. पण आता तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत ट्रोलर्सना उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.

आणखी वाचा- पहिल्या प्रेमात अपयश, आईसाठी ब्रेकअप; अफेअर्समुळे चर्चेत राहिलं अमृता सिंहचं आयुष्य

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने स्वतःचा चेहरा एका मास्कने पूर्णपणे झाकून घेतला आहे. अशा अवतारात ती ओळखूही येत नाहीये. ऊनापासून बचाव करण्यासाठी तिने काळ्या रंगाचा चश्मा घातला आहे. हा फोटो शेअर करताना काजोलने त्या सर्वांना उत्तर दिलं आहे. ज्यांनी आतापर्यंत काजोलला तिच्या त्वचेच्या रंगावरून ट्रोल केलं आहे. तिने लिहिलं, “त्या सर्वांसाठी जे मला विचारतात की मी एवढी गोरी कशी काय झाले.”

आणखी वाचा- “काजोलमुळे…” तब्बल २५ वर्षांनी ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाबद्दल रवीना टंडन स्पष्टच बोलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kajol instagram

दरम्यान पिंकव्हिलाला २०१४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने स्कीन लाइटनिंगच्या ट्रीटमेंटवर मौन सोडलं होतं. ती म्हणाली होती, “मी कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेतलेली नाही. फक्त आता मी ऊनापासून दूर राहते. माझ्या करिअरमधील १० वर्ष मी सातत्याने ऊनात काम करत होते. त्यामुळे माझी त्वचा टॅन झाली होती. आता मी ऊनात काम करणं बंद केलं आहे. त्यामुळे टॅनिंग अजिबात होत नाही. ही कोणतीही शस्त्रक्रिया नाही तर घरी राहण्याची कमाल आहे.”