अजय देवगणशी लग्न केल्यावर दोन महिन्यात वाढलं होतं काजोलचं आठ किलो वजन; कारणांचा खुलासा करत म्हणाली... |Kajol reveals the reason behind she gained 8 kilos in 2 months after marrying Ajay Devgn | Loksatta

अजय देवगणशी लग्न केल्यावर दोन महिन्यात वाढलं होतं काजोलचं आठ किलो वजन; कारणांचा खुलासा करत म्हणाली…

काजलने १९९९ मध्ये अभिनेता अजय देवगणशी लग्न केलं होतं. लग्नानंतर पहिल्या दोन महिन्यांतच तिचं तब्बल आठ किलो वजन वाढलं होतं.

अजय देवगणशी लग्न केल्यावर दोन महिन्यात वाढलं होतं काजोलचं आठ किलो वजन; कारणांचा खुलासा करत म्हणाली…
काजोल आणि अजय देवगण

अभिनेत्री काजोलचा ‘सलाम वेंकी’ चित्रपट ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. काजोल चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच प्रमोशनदरम्यान ती अनेक जुने किस्से आणि आठवणीही सांगत असते. अलीकडेच तिने लग्नानंतर तिचं वजन वाढलं होतं आणि तिला याची जाणीव झाली नव्हती असा खुलासा केलाय.

“सावरकरांच्या सल्ल्यानुसारच….”; शरद पोंक्षेंचे लता मंगेशकर यांच्याबद्दल वक्तव्य

‘Mashable’ ला दिलेल्या एका मुलाखतीत काजलने लग्नानंतर वाढलेल्या वजनाच्या कारणांबद्दल खुलासा केला. काजलने १९९९ मध्ये अभिनेता अजय देवगणशी लग्न केलं होतं. लग्नानंतर पहिल्या दोन महिन्यांतच तिला सर्व प्रकारचे पराठे खाण्याची सवय लागली होती. कोणत्याही पंजाबी कुटुंबात पराठे हा आहारातील महत्त्वाचा भाग असतात. ती आलू, कच्चे आलू, पनीर, गोबी, पनीर-गोबीचे बनवलेले पराठे खात होती. त्यावर भरपूर प्रमाणात लोणी पण असायचं. “खरं तर नेमकं काय होतंय, हे समजण्याआधीच माझं दोन महिन्यांत तब्बल ८ किलो वजन वाढले होतं. विशेष म्हणजे त्या दिवसांमध्ये तर डाएटबदद्ल फारशी माहितीही नव्हती,” असं काजोलने सांगितलं.

लेकीच्या जन्मानंतर काय बदललं? आलिया भट्ट पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली, “अभिनेत्री म्हणून माझा….”

काजोलने सासू वीणा देवगण यांच्याशी असलेल्या खास बॉन्डबद्दलही भाष्य केलं. लग्नाच्या २३ वर्षांहून अधिक काळांपासून आमचं नातं आहे. आम्ही भरपूर मासे खातो आणि खेकडे साफ करतो. तसेच आपण कायम हातांनी जेवत असल्याचं ती म्हणाली. हाताने जेवल्यावर अन्नाची चवच निराळी लागते. आयुर्वेदानुसार आपली बोटं ओठांना स्पर्श करताच विशेष एन्झाईम्स बाहेर पडतात, ते केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत तर पचनास देखील मदत करतात. त्यामुळे तुम्ही हातांनी जेवत नसाल, तर तुम्ही ती चव मिस करताय, असं ती म्हणाली.

काजोलने सांगितला शाहरुख आणि अजय यांच्यातील फरक; म्हणाली, “SRK मेहनत…”

अभिनेत्री रेवतीने दिग्दर्शित केलेला ‘सलाम वेंकी’ चित्रपट ९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात काजोलने वेंकीची भूमिका साकारणाऱ्या विशाल जेठवाच्या आईची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 16:27 IST
Next Story
“तुझ्या चित्रपटाच्या सेटवर येईन पण…” शाहरुख खानने आर्यनसमोर ठेवली ‘ही’ अट