अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘इमरजंसी’ चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र आहे. ती या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या आसाममध्ये रेकी करत आहे. यादरम्यानचेच काही फोटो कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. या फोटोंमध्ये ती आपल्या टीमबरोबर काम करण्यात व्यग्र असल्याचं दिसून येत आहे. पण घनदाट जंगल आणि जंगलामधील नदी पार करणं कंगनासाठी कठिण होतं. तिने या संबंधितच शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – बेबी बंप फ्लॉन्ट करत बिपाशा बासूने केलं आजवरचं सगळ्यात बोल्ड फोटोशूट, गरोदरपणातील ‘तो’ लूक व्हायरल

…अन् कंगना नदीत पडली
कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अतिउत्साह असला की नेमकं काय घडतं हे सांगितलं आहे. नदीमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कंगना पडते. आणि याच पाण्यामधून वाट काढून ती चालत असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

कंगनाने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “अतिउत्साह असला की हे असं होतं.” कंगनाचा हा फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाचं शर्ट, अंगालगत फिटींग पँट, डोक्यावर टोपी घातली आहे. कंगना तिचं हे काम अगदी एण्जॉय करताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इमरजंसी’ या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये इंदिरा गांधी यांच्या भूमिकेमधील कंगना पाहायला मिळाली. आणीबाणीच्या काळातील परिस्थिती या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न कंगना करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.