अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानचं नुपूर शिखरेशी लग्न झालंय. ३ जानेवारी रोजी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर १० जानेवारीला त्यांचं उदयपूरमध्ये लग्न पार पडलं. त्यानंतर आज आमिरने मुंबईत मुलीच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा आयोजित केला. या सोहळ्यात बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शनला कंगना रणौतनेही हजेरी लावली. कंगनाने रिसेप्शनमध्ये सुंदर लेहेंगा परिधान केला होता. तिने कार्यक्रमाला हजेरी लावल्यावर माध्यमांना पोज दिल्या. यावेळी पापाराझींबरोबर तिने ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. पापाराझींनी जय श्री राम म्हणताच कंगनानेही ‘जय सियाराम’ व ‘जय श्री राम’ म्हटलं. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाचे मुंबईत रिसेप्शन; शाही सोहळ्यातील फोटो पाहिलेत का?

आमिर खानने बॉलीवूडमधील जवळपास सर्व सेलिब्रिटींना मुलीच्या रिसेप्शनसाठी निमंत्रित केलं. इतकंच नाही तर दाक्षिणात्य स्टार सूर्या, नागा चैतन्या, अभिनेत्री सोभिता धुलिपाला यांनीही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

दरम्यान, आयरा ही आमिर खान व त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. या रिसेप्शन सोहळ्यात संपूर्ण खान कुटुंबाने उत्साहाने नुपूर व आयराबरोबर फोटो काढल्याचंही दिसून आलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut says jay shri ram at ira khan nupur shikhare reception video viral hrc
First published on: 14-01-2024 at 00:04 IST