कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर भाष्य करताना दिसते. विषय कोणताही असो कंगना आपलं मत स्पष्टपणे मांडते. शिवाय स्वतःच्या खासगी आयुष्याबाबतही ती बऱ्याच बोलताना दिसते. आता तर कंगनाने तिची तुलना चक्क अभिनेत्री मधुबाला यांच्याशी केली आहे. कंगनाने तिचे काही जुने फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत एक वक्तव्य केलं आहे.
आणखी वाचा – “तू हिंदू आहेस म्हणून…” आदिल खानच्या कुटुंबियांबाबत राखी सावंतचा नवा खुलासा, म्हणाली, “इस्लाम धर्म…”
काय म्हणाली कंगना रणौत?
कंगनाने तिचे व मधुबाला यांचे काही फोटो कोलाज केले. हे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर करत ती म्हणाली, “मी मोठ्या पडद्यावर मधुबाला यांची भूमिका साकारावी असं लोकांना वाटतं. जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा मधुबाला ऐन तारुण्यात जशा दिसत होत्या तशीच मी दिसायचे. पण अजूनही मी याबाबत ठाम नाही.”

त्यानंतर कंगनाने करिअरच्या सुरुवातीचे तिचे काही फोटोही शेअर केले. या फोटोंमध्ये ती अगदी वेगळीच दिसत आहे. तसाच तिचा लूकही वेगळा आहे. एक फोटो शेअर करत ती म्हणाली, “हे देवा, चित्रपटसृष्टीमध्ये हे माझं पहिलं वर्ष होतं.” या फोटोंमध्ये कंगनाची फॅशनही अगदी हटके असल्याचं दिसून येत आहे.

मधुबाला यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. कंगना आज त्यांच्याशीच स्वतःची तुलना करत आहे. कंगनाने २००६मध्ये ‘गँगस्टर’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सध्या तिचे प्रदर्शित होणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरत आहेत. आता तिच्या आगामी चित्रपटांना तरी यश मिळणार का? हे पाहावं लागेल.