Five Sequels That Broke Box Office Records : सध्या सर्वत्र ‘कांतारा चॅप्टर १’ बद्दल चर्चा सुरू असल्याचं दिसतं. ‘कांतारा’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच ‘कांतारा चॅप्टर १’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सध्या तुफान प्रतिसाद मिळत आहे.

ऋषभ शेट्टी लिखित व दिग्दर्शित ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, ‘कांतारा चॅप्टर १’ हा पहिला सिक्वल नाहीये, ज्याने बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले आहेत. यापूर्वीसुद्धा असे काही सिक्वल प्रदर्शित झालेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले होते. कोणते आहेत ते सिक्वल जाणून घ्या…

स्त्री १ – बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री २’ हा चित्रपट १५ ऑग्स्ट २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला. ‘न्यूज १८च्या वृत्तानुसार’ २०२४ मध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ८८० कोटी रुपये कमावले होते.

कांतारा चॅप्टर १ – ऋषभ शेट्टी लिखित व दिग्दर्शित ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट नुकताच २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार या चित्रपटाने आठवड्याभरातच तब्बल ५०० कोटींचा गल्ला जमवला.

भूल भुलौया ३ – बॉलीवूडमधील प्रसिद्ध हॉरर कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘भूल भुलैया’ ३ हा सिनेमा. हा चित्रपट ‘भूल भुलैया’ याचा तिसरा भाग आहे. यामध्ये कार्तिक आर्यनसह माधुरी दीक्षित व विद्या बालनही झळकलेल्या. या चित्रपटाने जगभरात ४२१ कोटी कमावले होते.

द्रृश्यम २ – अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉलीवूडमधील लोकप्रिय क्राइम थ्रीलर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने ३४५ कोटी कमावले होते.

पुष्पा २ – सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केलेली. या चित्रपटने जगभरात १,७८० कोटी कमावलेले. ‘पुष्पा’मध्ये दाक्षिणात्य अभिनेता अल्लु अर्जून व रश्मिका मदांना यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.