बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकारांना मिसळ पाव असो वा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेणं नेहमीच आवडतं. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे अक्षय कुमार. अक्षयचा पुण्यामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो मिसळ पाववर ताव मारताना दिसला. आता करीना कपूर खानला महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्याचा मोह आवरला नाही.
आणखी वाचा – खास मैत्रिणीला भेटायला गेले किरण माने, फोटोही केला शेअर, म्हणाले, “तिने मला…”
करीना तिच्या फिटनेसची किती काळजी घेते हे तिच्या लूकवरुनच दिसून येतं. पण ती महाराष्ट्रीयन पदार्थांच्या प्रेमात आहे. आताही तिने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पापड, लोणचं, डाळ खिचडीचा आस्वद घेतला. यादरम्यानचा फोटो करीनाने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

करीनाने हा फोटो शेअर करत तिची आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरला टॅग केलं आहे. करीनाने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “माझं मन भरलं आहे”. करीना अधिकाधिक पौष्टिक पदार्थ खाण्याकडे भर देते. मध्यंतरी ऋजुताने तिच्या घरी करीनासह करिश्मा कपूरला जेवणासाठी घरी बोलावलं होतं.
आणखी वाचा – ‘वेड’ची कमाई पाहून भारावली रितेश देशमुखची वहिनी, म्हणाली, “४१ कोटी रुपयांचा…”
यावेळी त्यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. झुणका, भाकरी, अंबाडी भाजी, कोथिंबीर वडी, सोलकढी, भोपळ्याचे भरीत आदी पदार्ख खाल्ले. ऋजुताने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसाठी काम केलं आहे. शिवाय करीनाचीही ती आहारतज्ज्ञ आहे. ऋजुताने या दोघींसाठी मराठमोळ्या पद्धतीचं जेवणं बनवलं होतं.