९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूरला ओळखलं जातं. आजवर तिने ‘कुली नंबर वन’, ‘बीवी नंबर वन’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. १९९१ पासून करिश्माने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. आता करिश्माला इंडस्ट्रीमध्ये ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का अभिनेत्रीने नुकत्याच नेटफ्लिक्सच्या मुलाखतीत तिच्या नावाचा खरा उच्चार नेमका काय आहे याबाबत खुलासा केला आहे.

करिश्मा कपूर सध्या ‘मर्डर मुबारक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिच्याबरोबर पंकज त्रिपाठी, सारा अली खान, विजय वर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. मुलाखतीत अभिनेत्रीला तुझ्या नावाचा नेमका उच्चार काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर करिश्माने दिलेल्या उत्तराने सगळेच थक्क झाले.

हेही वाचा : प्रथमेश परबच्या लग्नाला १ महिना पूर्ण! बायकोने शेअर केली रोमँटिक पोस्ट; पाहा Unseen फोटो

“माझं नाव करिश्मा नाही ते करिज्मा (karisma) असं आहे.” यावर पंकज त्रिपाठींसह उपस्थित सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. सारा म्हणाली, “मग तू एवढी वर्षे चुकीचा उच्चार होतोय हे सर्वांना सांगितलं का नाहीस?” यावर करिश्मा म्हणाली, “आता कितीतरी वर्षे मी काम करतेय लोक मला प्रेमाने करिश्मा म्हणत असतील तर काय हरकत आहे? म्हणून मी काहीच बोलत नाही. पण मूळ नाव करिज्मा असंच आहे.”

हेही वाचा : “मुंबईत सुरुवातीला आलो तेव्हा…”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने केला लोकलने प्रवास, सांगितला खास अनुभ

करिश्मा कपूरचा खुलासा ऐकून विजय वर्मा म्हणाला, “यापेक्षा लोलो म्हणणं सगळ्यात बेस्ट आहे.” अभिनेत्रीला संपूर्ण कपूर कुटुंबीय लोलो बोलत असल्याने करिश्माला बॉलीवूडमध्ये लोलो, तर करिनाला बेबो म्हणून ओळखलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांना देखील करिश्माच्या नावाचा खरा उच्चार करिज्मा आहे हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला आहे.