Astrological Prediction About Katrina’s Pregnancy : कतरिना कैफ व विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. गेल्या महिन्यातच दोघांनी ही आंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली. कतरिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती देत तिचा फोटो शेअर केला, तेव्हापासून कतरिना-विकी यांच्या होणाऱ्या बाळाबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतं.

कतरिना व विकी कौशल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधलेली. लग्नाच्या जवळपास अडीच वर्षांनंतर दोघांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आणि आता दोघेही लवकरच त्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. कतरिनाने ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी तिच्या गरोदर असण्याबद्दल चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. त्यानंतर ती तिच्या दीराच्या सनी कौशलच्या वाढदिवसाच्या पार्टीत पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी ही बातमी शेअर केल्यानंतर दिसली. त्यावेळीसुद्धा अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झाले होते.

कतरिना व विकीच्या होणाऱ्या बाळाबद्दल ज्योतिषांचं भाकीत

माध्यमांच्या वृत्तानुसार कतरिनाची प्रसूती याच महिन्यात (ऑक्टोबर) मध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप या दोघांनी याबद्दलची कुठलीही माहिती शेअर केली नाहीये. अशातच या गुड न्यूजनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांना मुलगी होणार की मुलगा याबद्दल उत्सुकता आहे. याबद्दल आता ज्योतिषी अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी भाकीत केलं आहे. त्यांच्या मते कतरिना व विकीला कन्या रत्न प्राप्त होणार आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबद्दल सांगितलं आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी कतरिना व विकीचं पहिलं मूल मुलगी असणार आहे असं म्हटलंय. यावेळी त्यांनी या जोडीचा फोटोही शेअर केला आहे.

अनिरुद्ध कुमार मिश्रा यांच्या एक्स अकाउंटवर त्यांनी पूर्वीसुद्धा सेलिब्रिटींच्या मुलांबद्दल भाकीत केल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या अकाउंटवर अनुष्का शर्मा विराट कोहली आणि करीना कपूर व सैफ अली खान या दोन जोडीचा फोटो पाहायला मिळत असून त्याला त्यांनी “२०२१ मध्ये दोन सेलिब्रिटी मुलांना जन्म देणार असून माझ्या अंदाजानुसार अनुष्का मुलीला तर करीना तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म देईल.” अशी कॅप्शन दिलेली. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं हे भाकीत खरं ठरलं.

ज्योतिषी अनिरुद्ध कुमार मिश्रा यांच्या भाकितानुसार आता खरंच कतरिना व विकीला मुलगी होईल का याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळले. दरम्यान, अलीकडेच अभिनेता अरबाज खानच्या पत्नीने शूरा खाननेही मुलीला जन्म दिला असून अनेक सेलिब्रिटींना पहिलं मूल मुलगीच झाल्याचं पाहायला मिळतं.