scorecardresearch

“ही आपली संस्कृती…” ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांची ‘पठाण’वर टीका, सेन्सॉर बोर्डालाही सुनावले खडेबोल

‘केजीएफ’ मधील अभिनेते अनंत नाग यांनी सेन्सॉर बोर्डच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले

“ही आपली संस्कृती…” ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांची ‘पठाण’वर टीका, सेन्सॉर बोर्डालाही सुनावले खडेबोल
फोटो : इंडियन एक्सप्रेस

शाहरुख खानचा ‘पठाण’ गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. शाहरुखचे चाहते गेले काही दिवस या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. याच्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी यातील ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून चांगलाच वाद पेटला आहे. सेन्सॉर बोर्डनेही या चित्रपटात काही बदल सुचवले होते.

नुकतंच ‘केजीएफ’मध्ये झालकलेले ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांनी यावर प्रतिक्रिया देत या चित्रपटावर टीका केली आहे. या गाण्यातून अश्लील कंटेंटला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दीपिकाने परिधान केलेल्या कपड्यांवरून अनंत नाग यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा : वडिलांच्या निधनानंतर फराह आणि साजिद खानकडे होते निव्वळ ३० रुपये; ‘या’ दिग्गज लेखकाने केलेली मदत

‘एशियानेट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनंत नाग म्हणाले, “महिलांना अशा प्रकारच्या कपड्यांमध्ये पडद्यावर दाखवणे हे आपल्या संस्कृतीत बसणारं नाही. जर सेन्सॉर बोर्डने त्यांचं काम चोख बजावलं असतं तर ही वेळ कदाचित आलीच नसती. चित्रपट सोडाच, पण ओटीटीवरसुद्धा ज्या पद्धतीचा अश्लील कंटेंट दाखवला जातो ते चुकीचं आहे. सगळ्या गोष्टी उघडपणे दाखवल्या जात आहेत आणि याला कुणीच लगाम घालू शकत नाहीये,”

पुढे ते म्हणाले, “भारतीय चित्रपटात किंवा छोट्या पडद्यावर ही अश्लीलता दाखवणं कुठेतरी थांबायला हवं. आपली संस्कृती परंपरा यांच्या विरोधात अशा गोष्टी दाखवल्या तर नक्कीच लोकांमध्ये असंतोष पसरेल.” गेल्या काही दिवसांत बऱ्याच मोठ्या लोकांनी ‘पठाण’मधील या गाण्यावर आक्षेप घेतलेला आहे. २५ जानेवारीला ‘पठाण’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानसह दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 11:59 IST

संबंधित बातम्या