scorecardresearch

Premium

“तेव्हाच जाणवलं यांचं लग्न होणार”, करण जोहरने सांगितला पार्टीतील ‘तो’ प्रसंग, सिद्धार्थ-कियाराच्या नात्याबद्दल म्हणाला…

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या नात्याबद्दल करण जोहरने केला खुलासा, म्हणाला…

karan johar recalls when sidharth malhotra and kiara advani fighting with each other
सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी व करण जोहर

‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनला सध्या प्रेक्षकांकडून भरभरून पसंती मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांनी हजेरी लावली होती. यावेळी या दोन्ही अभिनेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

वैयक्तिक आयुष्यात वरुण धवनने त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल, तर सिद्धार्थने बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीशी लग्न केलं आहे. करणला सिद्धार्थ-कियाराचं रिलेशनशिप आणि ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचा अंदाज एका पार्टीदरम्यान आला होता. याविषयी सांगताना करण म्हणाला, “मला चांगलंच आठवतंय त्यावेळी या दोघांची (सिद्धार्थ-कियारा) भांडणं झाली होती. सिडला खूप ताप होता तरी तो माझ्या पार्टीला उपस्थित राहिला होता.”

prison rape 15 year girl
आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार
Chanakya Niti An intelligent person never do these mistakes read what chanakya said about clever people
Chanakya Niti : बुद्धिमान व्यक्तीनी करू नये ‘या’ चुका; वाचा, चाणक्य काय सांगतात…
man commits suicide after wife sister in law asking money for liquor
पिंपरी : दारूसाठी पैसे मागणाऱ्या पत्नी, मेहुणीच्या त्रासाला कंटाळून देहूरोडमध्ये तरुणाची आत्महत्या
Zee-Sony Merger
विलीनीकरणाचा करार रद्द झाल्यानंतर झी एंटरटेन्मेंटचे सोनीविरोधात कायदेशीर कारवाईचे संकेत

हेही वाचा : “माझा ड्रायव्हर वैतागलाय…”, प्राजक्ता माळीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…

करण पुढे म्हणाला, “कियारा सुद्धा माझ्या पार्टीला आली होती. पण, पार्टीत सुरूवातीला ते दोघं एकमेकांशी जास्त बोलत नव्हते. आधी भांडले आणि पुढे अगदी दोन तासांत त्यांचं भांडण मिटलं आणि त्यानंतर मी किआरा स्वत:च्या हाताने सिद्धार्थला जेवण भरवत असल्याचं पाहिलं. त्या क्षणी मला जाणवलं दोघांमध्ये सुंदर नातं आहे आणि लवकरच दोघेही लग्न करतील.”

यावर वरुण म्हणाला, “कियारा आणि मी आम्ही दोघं एका गाण्याचं शूटिंग करून निघालो होतो. तेव्हा कियारा गाडीत प्रचंड आनंदी होती. कारण, सिद्धार्थ तिला भेटायला येणार होता. ‘सिद्धार्थ मला भेटायला येतोय…त्याला ताप आलाय तरीही येतोय’ असं ती मला सारखं सांगत होती. तेव्हा मला सुद्धा त्यांचं प्रेम जाणवलं”

हेही वाचा : करण जोहर बनवणार ‘झिम्मा’चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे खुलासा करत म्हणाला, “मी स्पष्टपणे…”

दरम्यान, सिद्धार्थ-कियाराने एकत्र ‘शेरशाह’ चित्रपटात काम केलं आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर सिद्धार्थ-कियाराने ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमध्ये थाटामाटात लग्न केलं. या लग्नाला करण जोहर सुद्धा उपस्थित होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Koffee with karan karan johar recalls when sidharth malhotra and kiara advani fighting with each other and then patch with each other sva 00

First published on: 23-11-2023 at 16:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×