बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. बॉलिवूडमधील गॉसिप आणि करण जोहरचा चॅट शो यामुळे तो चांगलाच चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांपासून नेपोटीजममुळे उद्भवलेल्या वादामुळे करण जोहरवर बरीच टीका झाली. अशातच करण जोहरचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एकेकाळी आपण अनुष्काचे करिअर उद्धवस्थ करणार असल्याचा विचारात असल्याची कबुली त्याने दिली आहे. या व्हिडिओवरुन करणवर आता अनेक सेलिब्रिटींनी टीका करायला सुरुवात केली आहे. बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक कमाल राशिद खान (केआरके) यांनेही करण जोहरला चांगलच सुनावलं आहे.

हेही वाचा- VIDEO : “सलमान खान संपूर्ण भारताचा ‘भाऊ’ नाही”; ‘भाईजान’ शब्दावरुन अभिनेत्याचे स्पष्टीकरण, म्हणाला, “मी फक्त…”

केआरके ट्वीट केलं आहे की, ‘करण जोहर कबूल करतो की त्याला अनुष्का शर्माचे करिअर संपवायचे होते आणि त्याने अनेक कलाकारांचे करिअर उद्ध्वस्त केले. सुशांत सिंग राजपूतबरोबरही असेच केले. कंगना रणौत आणि प्रियांका चोप्राबाबतीतही. आता जनतेने त्यांची काळजी घ्यावी. असे म्हणत केआरकेने करणला सुनावलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाला होता करण?

२०१६ च्या १८ व्या मामी फेस्टिव्हलमध्ये करण जोहरने याबद्दल कबुली दिली होती. त्यावेळी ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने चित्रपटातील कलाकारांसह हजेरी लावली होती. करण म्हणाला, “मला अनुष्का शर्माचं करिअर खरंच उद्ध्वस्त करायचं होतं. कारण जेव्हा मला आदित्य चोप्राने तिचा फोटो दाखवला तेव्हाच मी तिला घेऊ नकोस असा सल्ला आदित्यला दिला होता.