कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कश्मीराचा अपघात झाला आहे. तिने इन्स्टाग्रामवर अपघाताची माहिती दिली आहे. कश्मीराने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेला एक फोटो शेअर केला आहे.

कश्मीराने कारच्या सीटचा एक फोटो पोस्ट केला आहे. या सीटवर रक्ताने माखलेले कपडे व टिश्यू दिसत आहेत. हा फोटो शेअर करून कश्मीराने तिच्या अपघाताची माहिती दिली. कश्मीरा अपघातातून थोडक्यात बचावली आहे. काहीतरी मोठं होणार होतं पण वाचले, असं कश्मीराने म्हटलं आहे.

हेही वाचा- “ही वाईट वृत्ती आहे” म्हणत ऐश्वर्या रायने खेकड्यांशी केलेली फिल्म इंडस्ट्रीची तुलना

“देवा, मला वाचवल्याबद्दल आभार. भयंकर अपघात. काहीतरी मोठं होणार होतं, पण थोडक्यात बचावले. आशा आहे की या जखमांच्या खुणा राहणार नाहीत. रोजचा प्रत्येक क्षण जगा. आज माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे,” असं लिहून कश्मीराने एक फोटो पोस्ट केला आहे.

कश्मीरा शाहची पोस्ट –

View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कश्मीरा शाह सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे. तर तिची मुलं क्रिशांग व रेयान बाबा कृष्णाबरोबर मुंबईत आहेत. परदेशातच कश्मीराचा अपघात झाला आहे. कश्मीराच्या या पोस्टवर कृष्णाने कमेंट केली आहे. ‘थँक गॉड, तू सुरक्षित आहेस’ असं त्याने लिहिलं आहे. तनाज इराणी, किश्वर मर्चंट, राजेश खट्टर यांनी कमेंट्स करून कश्मीराची विचारपूस केली आहे. चाहतेही कश्मीराची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.