बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वतःपेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे. ज्यात सलमान खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. पण या यादीत काही अशाही अभिनेत्री ज्यांनी स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यांबरोबर ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. आता बदलत्या काळात दीपिका पदुकोण, कतरिना कैफ यांच्यासारख्या अभिनेत्री स्वतःपेक्षा वयाने कमी काम करताना दिसतात. पण काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांनी एका अभिनेत्याबरोबर काम केल्यानंतर त्याच्या मुलाबरोबरही ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री माधुरी दीक्षितचं नाव सर्वाधिक चर्चेत राहिलं आहे.

माधुरी दीक्षितने अभिनेते विनो खन्ना आणि त्यांचा मुलगा अक्षय खन्ना या दोघांबरोबरही काम केलं होतं. माधुरीने १९८८ मध्ये ‘दयावान’ चित्रपटात विनोद खन्ना यांच्याबरोबर काम केलं होतं. हा चित्रपट त्यातील एका गाण्यामुळे बराच चर्चेत राहिला होता. ‘आज फिर तुम पे प्यार आया है’ हे या चित्रपटातील गाणं प्रचंड गाजलं होतं आणि या गाण्यात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी बोल्ड सीन दिले होते. दोघांच्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा झाली होती. एकीकडे काही लोकांनी माधुरीवर टीका केली होती तर काहींनी या सीन्सना विरोधही केला होता कारण त्या काळात ते खूपच बोल्ड सीन होते.

आणखी वाचा- “माधुरी दीक्षित ९० व्या दशकातील सुपरस्टार पण आमिर- सलमान…” रवीना टंडनचं मोठं वक्तव्य

‘दयावान’ चित्रपटात विनोद खन्ना यांनी शक्ती वेलू ही भूमिका साकारली होती. तर माधुरीने नीलूच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाची त्या काळात बरीच चर्चा झाली होती आणि त्यात माधुरी दीक्षित- विनोद खन्ना ही जोडी खूप हिट ठरली होती. त्यानंतर माधुरी दीक्षितने विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नाबरोबरही ऑनस्क्रीन रोमान्स केला. या दोघांनी १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘महोब्बत’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात माधुरी आणि अक्षय यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि ‘ओ बेबी डोंट ब्रेक माय हार्ट’ हे गाणं बरंच लोकप्रिय ठरलं होतं.

आणखी वाचा-“ती दगडाच्या काळजाची बाई…” संजय दत्तच्या पहिल्या पत्नीच्या बहिणीने माधुरीवर केलेले गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचं तर १९८४ मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘अबोध’ चित्रपटातून तिने बॉलिवूड पदार्पण केलं होतं. पण १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटाने तिला स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली होती. या चित्रपटात अनिल कपूर यांची मुख्य भूमिका होती. माधुरी दीक्षित ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने त्या काळातल्या जवळपास सर्वच सुपरस्टार्सबरोबर काम केलं होतं आणि एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले होते.