शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहेत. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. अशा या ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक झळकली आहे. तिच्या कामाच देखील कौतुक केलं जात आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये गिरीजाने शाहरुख खानचा एक किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा – पक्षविरोधी कारवायांमुळे अर्चना गौतमीची तीन महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून झाली होती हकालपट्टी

हेही वाचा – शाहरुख खानच्या ‘जवान’ने अखेर ‘पठाण’चा मोडला वर्ल्डवाइड रेकॉर्ड; देशांतर्गत २४व्या दिवशी केली जबरदस्त कमाई

अलीकडे अभिनेत्री गिरीजा ओकने ‘जवान’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी तिला विचारलं गेलं की, “अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे तुला वाटलं की हा हे आहे, या कारणांमुळे तो एसआरके आहे.” गिरीजा म्हणाली, “काही सर्व्हनुसार, जगभरातील लोकं शाहरुखला टॉम क्रूझपेक्षा अधिक ओळखतात. जेव्हा अ‍ॅटीलचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आम्ही चेन्नईत एका हॉटेलमध्ये पार्टी करत होतो. तेव्हा शाहरुखने आम्हा मुलींना घरी जाण्यासाठी एक गाडी पाठवली. ज्याबरोबर दोन सुरक्षा रक्षक पाठवले होते. आम्ही हॉटेलपासून खूप लांब राहायला होतो. ते सुरक्षा रक्षक आमच्याबरोबर आले. लिफ्टपर्यंत आम्हाला पोहोचवलं आणि आम्ही जाईपर्यंत ते बाहेर थांबले होते. जेव्हा लिफ्ट वर गेली तेव्हा त्यांनी आम्हाला गूड नाइट करून ते निघून गेले. त्यांना तसं त्यानं सांगितलं होतं. असं कोण करतं? तो एक वेगळ्या प्रकारचा व्यक्ती आहे. आपण जे सगळं काही त्यांच्याबद्दल ऐकतो ना, हे सगळं खरं आहे.”

हेही वाचा – Video: ‘दार उघड बये’ ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा घेणार निरोप; शूटिंगच्या शेवटच्या दिवसातील काही खास क्षण पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गिरीजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने बरेच मराठी, हिंदी चित्रपट केले आहेत. ‘जवान’ चित्रपटानंतर तिचा नुकताच ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट भेटीस आला आहे. या चित्रपटामध्ये तिनं इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या विषाणूशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर नंदिता गुप्ता यांची भूमिका निभावली आहे.