Popular Singer cried in front of Priyanka Chopra: हिंदी व पंजाबी संगीत क्षेत्रात मिका सिंगला नावाजलेला गायक म्हणून ओळखले जाते. आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये त्याने गायलेली अनेक गाणी गाजली आहेत. मिका सिंग अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसतो.
आता एका मुलाखतीत मिका सिंग एका रिअॅलिटी शोमधील किस्सा सांगितला आहे. त्यामध्ये प्रियाकां चोप्रा हजर होती. मिका सिंगने नुकतीच शुभांकर मिश्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत मिका सिंगने तो एका रिअॅलिटी शोमध्ये का रडला होता आणि त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते, असा खुलासा आहे.
प्रियांका चोप्रासमोर गाताना रडलेला लोकप्रिय गायक
मिका सिंग म्हणाला, “कधीकधी मी माझी गाणी ऐकूण रडायचो. मला वाटतं की ते वयच तसं होतं. एका रिअॅलिटी शोमध्ये मी दोन ओळी गायल्यानंतर रडलो. आता मी हे कोणाला सांगितलं तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. ते म्हणतील की तू काही तानसेनचा मुलगा नाहीस”
पुढे मिका सिंग म्हणाला, “त्या रिअॅलिटी शोमध्ये मी ‘बडे अच्छे लगते है’ हे गाणे गात होतो. मला माझंच गाणं ऐकूण आनंद झाला. प्रियांका चोप्रा माझ्याशेजारी बसली होती आणि मी रडायला सुरुवात केली. त्यानंतर मला ट्रोल केले गेले. असे म्हटले गेले की त्याला गाता येत नाही म्हणून तो रडत आहे. सगळी इंडस्ट्री रिअॅलिटी शोमध्ये येऊन रडते. तीच गोष्ट मी केली तर लोकांनी मला विचारले की तू हे का करत आहेस?”, असे म्हणत मिका सिंगने किस्सा सांगितला.
स्क्रीनला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत मिका सिंगने म्हटले होते की जेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये आला होता. तेव्हा त्याला संगीत दिग्दर्शक व्हायचे होते. मिका सिंग म्हणाला होता की १९९८ ला ‘सावन में लग गयी आग’ हे माझं गाणं खूप गाजलं होतं. पण, त्यावेळी गायक नाही तर संगीत दिग्दर्शक व्हायचं होतं. म्हणून त्यावेळी मी गाण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं नाही.
मात्र, मिका सिंगने ‘सावन में लग गयी आग’ हे गाणं गाजल्यानंतर गायक म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला. मिका सिंगची पार्टी तो बनती है, ढिंक चिका, आज की पार्टी, तू मेरा हिरो अशी अनेक गाणी गाजली आहेत.
याच मुलाखतीत मिका सिंगने अनेक कलाकारांबाबत किस्से सांगितले आहेत. एकदा तो अमिताभ बच्च यांच्या पार्टीत गेला होता. मात्र, त्याला आमंत्रण नव्हते. तरीही ज्या पद्धतीने अमिताभ बच्चन यांनी त्याला वागणूक दिली, त्याचे त्याने कौतुक केले. याबरोबरच, सलमान खान हा दिवसा वेगळा व्यक्ती असतो आणि रात्री वेगळा व्यक्ती असतो. त्याला भेटण्याची योग्य वेळ मला माहित आहे. तसेच, तो माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारतो, असेही मिका सिंगने सांगितले.
दरम्यान, मिका सिंगने अनेक मुलाखतीत तो निर्मिती क्षेत्रात काम कऱण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, त्याच्या पहिलाच अनुभव वाईट ठरला. बिपाशा बसू व तिचा पती करण सिंग ग्रोवरबरोबर त्याने एक चित्रपट केला होता. त्यावेळी त्यांनी त्रास दिल्याचे वक्तव्य त्याने अनेक मुलाखतीत केले आहे.