नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जोगीरा सारा रा रा’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो नेहा शर्मासोबत रोमान्स करताना दिसत आहे. चित्रपटाव्यतिरिक्त नवाज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. नवाज आणि त्याची पत्नी आलियामध्ये वाद सुरू आहेत. हे वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचले आहेत. पत्नी आलियाबरोबर सुरू असलेल्या वादादरम्यान नवाजने खऱ्या प्रेमाबाबात वक्तव्य केलं आहे. नवाजचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
हेही वाचा– Video : “हा मूर्खपणा…”; सलमानकडून मिळालेल्या ‘त्या’ वागणुकीवर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला…




नवाज म्हणाला, “माझ्या आत एक हळवा रोमँटिक मुलगा आहे. प्रेमात पडणं चांगलं आहे. प्रेम असावं. आपण प्रेमात राहून प्रेम पसरवलं पाहिजे. प्रेम ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतर नवाजुद्दीनने सांगितलं की, मी खूप रोमँटिक व्यक्ती आहे.” नवाजुद्दीनच्या म्हणण्यानुसार खरं प्रेम फक्त छोट्या शहरांमध्ये होतं आणि जे मोठ्या शहरांमध्ये होतं ती फक्त एक तडजोड असते. नवाजुद्दीन म्हणाला, ‘छोट्या शहरांतील लोक स्वतःवर प्रेम करायला घाबरत नाहीत. कारण तिथे कोणी कोणाला जज करत नाही.’
हेही वाचा- “टीव्ही अभिनेत्री म्हणत त्यांनी मला…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला संघर्षकाळातील ‘ती’ आठवण
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘जोगीरा सारा रा रा’ या चित्रपटात दिसला होता. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे ज्यात त्याच्याबरोबर नेहा शर्मा दिसणार आहे.