scorecardresearch

Premium

Video : “हा मूर्खपणा…”; सलमानकडून मिळालेल्या ‘त्या’ वागणुकीवर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला…

सलमान खान आणि विकी कौशलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

salman khan vicky kaushal
सलमानने विकीची घेतली गळाभेट (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि विकी कौशल सध्या अबूधाबीमध्ये ‘आयफा २०२३’मध्ये सहभागी होण्याची तयारी करत आहेत. या दरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विकी कौशल सलमान खानला भेटायला येतो, मात्र सलमान त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. सलमानने विकीला दिलेल्या या वागणुकीवर भाईजानवर मोठी टीका होत आहे. या घटनेनंतर आता विकी कौशलने प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर विकीने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. विकी म्हणाला, “कधीकधी गोष्टी वाढतात. अशा गोष्टींबद्दल बोलणं हा मूर्खपणा आहे. व्हिडीओमध्ये जसं दिसलं तसं काहीच नव्हतं. अशा गोष्टींवर बोलण्यात काहीच अर्थ नाही.”

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

सलमानने विकीची गळाभेट घेतल्याचा व्हिडीओ समोर

सलमानने विकीकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सलमान आणि विकीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत सलमान विकीची गळाभेट घेताना दिसत आहे. विकीला दुर्लक्षित केल्याची बातमी बघूनच सलमानने विकीची गळाभेट घेतली असल्याची चर्चा सुरू आहे.

विकी कौशल चाहत्यांबरोबर सेल्फी घेत आहे. तेवढ्यात सलमान खान आपल्या बॉडिगार्डसमवेत तिथे पोहचला. सलमान खान तिथे येताच विकीने सलमानशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र सलमान खानने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि काही सेकंद थांबल्यानंतर सलमान तिथून निघून गेला. सलमानने विकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं व्हिडीओत दिसत होतं. एवढंच नाही, तर सलमानच्या बॉडिगार्डनेही विकीला बाजूला ढकलल्याचं दिसून आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

हा व्हिडीओ बघून विकीचे चाहते सलमान खानवर चांगलेच नाराज झाले आहेत. विकीला सामान्य माणसाप्रमाणे वागवलं गेलं असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. व्हिडीओ बघून काही लोक सलमानच्या रुबाबाची स्तुती करत आहेत, तर काही जण विकीला दिलेल्या वागणुकीवरून सलमानवर टीका करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal breaks silence on ignore by salman khan in iifa 2023 viral video dpj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×