बॉलिवूडमधील नवाब घराण्यातील सैफ अली खान आणि करीना कपूर खान ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. तैमूर व जेह या त्यांच्या दोन मुलांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसते. अनेकदा त्यांचे व्हिडीओही व्हायरल होत असतात.

तैमूर हा लोकप्रिय स्टारकिड आहे. पापाराझीसमोर तैमूर कित्येकदा फोटोसाठी पोझही देताना दिसतो. तैमूरला सांभाळणाऱ्या त्याच्या नॅनीबद्दल आता माहिती समोर आली आहे. नुकतंच नीतू कपूर यांनी तैमूरच्या नॅनीला दिल्या जाणाऱ्या पगाराबद्दल भाष्य केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा’ शोमध्ये नीतू कपूर यांनी हजेरी लावली. त्यानिमित्तान शोमध्ये खास कपूर स्पेशल एपिसोड सेलिब्रेट करण्यात आला.

हेही वाचा >> ‘लागिर झालं जी’ फेम नितीश चव्हाण मराठीमधील बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपटामध्ये झळकणार, लूक समोर

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, नोरा फतेही व दिग्दर्शक करण जोहर ‘झलक दिखला जा’ शोमध्ये परीक्षक आहेत. करणने नीतू कपूर यांना “करीना कपूर तैमूरचा सांभाळ करणाऱ्या नॅनीला एक कोटीपेक्षा जास्त पगार देते का?”, हा मजेशीर प्रश्न विचारला. यावर उत्तर देत त्या हसत म्हणाल्या, “करीना तैमूरच्या नॅनीला एक कोटी देते की पाच कोटी हे मला कसं माहीत असेल?”. कलर्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेही पाहा >> Photos : …अन् चित्रपटातील किसिंग सीन शूट करताना रेखा यांना रडू कोसळलं, नेमकं काय घडलं होतं?

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर आदेश बांदेकरांनी शेअर केला जुना व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफ अली खान आणि करीना कपूर २०१२ साली विवाहबंधनात अडकले. करीनाने २०१६ मध्ये तैमूर तर २०२२च्या फेब्रुवारी महिन्यात जेहला जन्म दिला. करीना आणि सैफ अली खानप्रमाणेच त्यांच्या मुलांचाही चाहता वर्ग मोठा आहे. कपूर फॅमिलीचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.