बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय कपूरने अभिनय व सौंदर्याने ७० व ८०च्या दशकातील काळ गाजवला. रीनाने कालिचरण, नागिन, अर्पण, सनम तेरी कसम, नसीब असे एक सो एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर रीनाचं तब्बल सात वर्ष अफेअर होतं. पण शेवटी शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम सिन्हा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर करिअर व प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच रीनाने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानशी लग्न केलं.

१९८३मध्ये रीना व मोहसिन खान यांनी लग्नगाठ बांधली होती. मोहसिन यांच्याशी विवाह करण्यासाठी रीनाने मनोरंजन विश्वाला रामराम केला होता. लग्नानंतर रीना मोहसिन यांच्याबरोबर पाकिस्तानात स्थायिक झाली होती. परंतु, लग्नाच्या सातच वर्षांनी त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याच निर्णय घेतला. १९९० मध्ये रीना व मोहसिन यांनी घटस्फोट घेतला. रीना व मोहसिन यांना सनम नावाची मुलगी आहे.

हेही वाचा>> प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्यावर जीममध्ये हल्ला, चाकूने केले वार; व्हिडीओ व्हायरल

रीनाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मोहसिन यांनी याबाबत भाष्य करणं टाळलं होतं. आता घटस्फोटाच्या ३३ वर्षांनी मोहसिन खानने रीनापासून वेगळं होण्याबाबत त्यांनी मौन सोडलं आहे. रिनाबरोबर घटस्फोट घेण्याबाबत मोहसिन म्हणाले, “मला याबाबत कोणताही पश्चाताप नाही. मी एका मुलीबरोबर लग्न केलं होतं. ती कोण आहे, कशी आहे याचा मी तेव्हा विचार केला नव्हता. पण पाकिस्तानमध्येच राहायचं आहे, हे मी निश्चित केलं होतं. कारण, पाकिस्तानच माझी ओळख आहे”.

हेही वाचा>> “कंगना रणौतचे चित्रपट बघता का?” कौतुकाचा वर्षाव करत संजय राऊत म्हणाले, “ती एक…”

“लग्नाआधी मी रीनाचा कोणताही चित्रपट पाहिला नव्हता. पण यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असल्याचं समजताच मी कदाचित थांबलो असतो. पण या व्यतिरिक्त मी चित्रपट पाहिलेले नाहीत. मी कधीच सौंदर्यावर भुललो नाही. मला व्यक्ती तिच्यातील चांगुलपणामुळे आवडते”, असंही पुढे मोहसिन म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटस्फोटानंतर रीना व मोहसिन यांची मुलगी सनमची कस्टडी क्रिकेटरकडे सोपविण्यात आली. परंतु, मोहसिन यांनी दुसरं लग्न केल्यानंतर रीना यांना मुलीची कस्टडी मिळाली.