बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेता तसेच पंजाब राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा या दोघांच्या रिलेशनशिपच्या चांगल्याच चर्चा होताना दिसत आहेत. एका रेस्टोरंटबाहेर हे दोघे एकत्र दिसल्याने याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं, त्यातच दोघांनीही पांढऱ्या रंगाचे सारखेच कपडे परिधान केले होते, त्यामुळे ते दोघे नक्की एकमेकांना डेट करतायत, असं सोशल मीडियावर म्हटलं गेलं.
“माझ्या पतीला शोधा”, २२ दिवसांपासून बेपत्ता नवऱ्यासाठी अभिनेते शेखर सुमन यांच्या बहिणीचा आक्रोश
खरंच परिणीती चोप्रा
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा सलग दोन दिवस एकत्र दिसले, त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या. पण, ते दोघेही चांगले मित्र आहेत. ते दोघे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिकले आहेत आणि त्यांचे बरेच कॉमन मित्र आहेत. तसेच राघव चढ्ढा ट्विटरवर फक्त ४४ जणांचा फॉलो करतात, त्यापैकी फक्त दोन बॉलिवूडमधील आहेत. त्यापैकी एक गुल पनाग आहे, जी आम आदमी पार्टीची सदस्य आहे, तर दुसरी आहे परिणीती चोप्रा. एकंदरीतच त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये कोणतीही तथ्ये सध्या दिसत नाहीयेत. ते फक्त मित्र आहेत.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.