बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची सध्या जोरदार चर्चा आहे. शनिवारी दिल्लीतील कपूरथला हाऊस येथे या दोघांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. परिणीतीने राघव यांना घातलेल्या अंगठीची किंमत आता समोर आली आहे.

परिणीती व राघव यांचा साखरपुडा अत्यंत दिमाखात पार पडला. या समारंभाला बॉलीवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांनीसुद्धा हजेरी लावली. दोघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. परिणीतीने साखरपुड्याचे फोटो शेअर करताच त्यांच्या अंगठ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आणखी वाचा : फक्त प्रियांका चोप्राच नव्हे तर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनीही सुंदर दिसण्यासाठी घेतला आहे सर्जरीचा आधार

परिणीतीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये एक फोटो त्या दोघांच्या अंगठ्यांचा होता. यात परिणीतीने हिऱ्याची अंगठी घातलेली दिसत आहे तर राघवने सोन्याचा कार्टिअर लव्ह बँड घातला आहे. परिणीतीने राघवला घातलेल्या या साध्या आणि सोबर लव्ह बँडची किंमत १.२ लाख आहे. हा लव्ह बँड संपूर्ण सोन्याचा असून त्यावर नाजूक डिझाईन आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “आता आम्ही लग्नाची…” परिणीती-राघवचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रियांका चोप्राची पोस्ट चर्चेत

दरम्यान, परिणीती नुकतीच दिल्लीला साखरपुडा उरकून पुन्हा मुंबईत दाखल झाली. या वेळी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत राघवसाठी खास कॅप्शन लिहिली होती. तर आता या दोघांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.