बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा हे दोघेही उद्या (१३ मे रोजी) साखरपुडा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दोघांच्याही साखरपुड्याची जय्यत तयारी केली जात आहे. साखरपुड्यासाठी परिणीतीच्या संपूर्ण घराला बाहेरून रोषणाई केल्याचे दिसत आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. या दोघांच्या साखरपुड्यासाठी खास थीम ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा- परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी खास थीमचे आयोजन; ‘असा’ असेल दोघांचा लूक

परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे. या साखरपुड्यासाठी एकूण १५० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यांव्यतरिक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार आहे.

या कलाकारांना देण्यात आले आमंत्रण

आमंत्रण देणण्यात आलेल्या पाहुण्यांमध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, सानिया मिर्जा, अर्जुन कपूर, मलाइका अरोड़ा, फराह खान, करण जोहर यांचा समावेश आहे. तसेच काही राजकीय नेतेही या सारखपुड्यात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा- अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी घरोघरी मासे पोहोचवायची ट्विंकल खन्ना; अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “मच्छीवाली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखरपुड्याच्या तयारीसाठी परिणीती काही दिवस आधीच दिल्लीत पोहोचली होती. ड्रेसपासून डेकोरेशनपर्यंत सर्व काही खास थीमखाली तयार केले जात आहे. परिणीती-राघव दोघेही पंजाबी कुटुंबातील असल्यामुळे साखरपुड्याचा कार्यक्रम पंजाबी पद्धतीने होणार आहे. साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातात अंगठी घालत साखरपुडा करतील. यानंतर छान डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.