बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा २४ सप्टेंबरला विवाहबंधनात अडकले. दयपूरच्या लीला पॅलेसमध्ये त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नात कलाकारांबरोबर अनेक राजकीय मंडळीही सहभागी झाली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा- सलमान खान आणि अर्जुन कपूरमधील भांडण मिटले? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

लग्नानंतर परिणीती पुन्हा कामावर परतली आहे. नुकतीच ती मुंबई विमानतळावर दिसून आली. मानव मंगलानी यांनी परिणीतीचा मुंबई विमानतळावरचा व्हिडिओ इन्स्टाग्रावर शेअऱ केला आहे. यावेळी तिने केलेल्या लूकची सगळीकडे चर्चा सुरु आहे. यावेळी परिणीतीने काळ्या रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाची ट्राउजर घातली होती. टीशर्टवर तिने काळ्या रंगाचा कोटही घातला होता. हातात गुलाबी रंगाच्या बांगड्या आणि भांगेत कूंकू होत.

लग्नानंतर परिणीती आणि राघव ३ ठिकाणी रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मुंबई, दिल्ली आणि चंदीगढमध्ये. बॉलीवूडमधील कलाकारांसाठी मुंबईत, राजकीय नेत्यांसाठी दिल्लीत आणि नातेवाईकांसाठ चंदीगढमध्ये परिणीती आणि राघव रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता दिल्ली आणि चंदीगढमधील रिसेप्शनचा विचार तुर्तास रद्द करण्यात आला असून फक्त मुंबईतच रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. 

हेही वाचा- Video: “मोदीजी, मला चीन किंवा पाकिस्तानमध्ये पाठवा…” राखी सावंत सैनिकांचा गणवेश परिधान करून उतरली रस्त्यावर, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणीतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तिचा मिशन रजनीगंज चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्याबरोबर अक्षय कुमारची मुख्य़ भूमिका आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवू शकला नाही. जगभरात या चित्रपटाने २२ कोटींची कमाई केली आहे तर भारतात या चित्रपटाने केवळ १८.५ कोटींचा गल्ला जमवला आहे.