शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील दमदार कमाई अजूनही सुरू आहे. चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. आता तो हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे. सोमवारच्या कमाईनंतर त्याने यशच्या KGF: Chapter 2 ला मागे टाकलंय, असं दिसत आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’नुसार, पठाणने सोमवारी अंदाजे ९.५० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे देशांतर्गत या चित्रपटाने जवळपास ४३८.५ कोटी रुपये कमावले आहेत. या सुरुवातीच्या अंदाजांवर विश्वास ठेवला तर चित्रपटाने हिंदी ‘केजीएफ २’ ला मागे टाकलंय. ‘केजीएफ २’ ने भारतातील सर्व भाषांमध्ये तब्बल ९६० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, जगभरात या चित्रपटाने ११४८ कोटी रुपये कमावले होते.

“विक्रम बत्राही…” Sidharth Malhotra-Kiara Advani च्या लग्नाबद्दल ‘शेरशाह’च्या निर्मात्यांची प्रतिक्रिया

‘बॉक्स ऑफिस इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या सोमवारी ‘पठाण’च्या कलेक्शनमध्ये ४०% घसरण झाली. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे विकेंड वगळता इतर दिवसांसाठी चित्रपटाच्या तिकिटांचे दर कमी करण्यात आले आहेत. सोमवारी चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म्सने दिलेल्या माहितीनुासर, ‘पठाण’ने जगभरात एकूण ८३२.२० कोटी रुपये कमावले. अशातच आता १७ फेब्रुवारीपर्यंत दुसरा कोणताही मोठा चित्रपट रिलीज होणार नाहीये, त्यामुळे ‘पठाण’जवळ हिंदी भाषेत ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याची संधी आहे. हिंदी ‘बाहुबली २’ ने ५१०.९९ कोटी रुपयांची कमाई केली होती.

आकर्षक रोषणाई, म्युझिक, अन्…; Sidharth Malhotra-Kiara Advani चा संगीत सोहळा पडला पार, Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या ‘पठाण’चे यश केवळ चित्रपटाच्या टीमकडूनच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीकडूनही साजरं केलं जात आहे. चित्रपटाच्या दमदार कमाईमुळे प्रेक्षक पुन्हा थिएटर्सकडे येऊ लागले आहेत. करोनाकाळानंतर थिएटर्सकडे पाठ फिरवणारे प्रेक्षक पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. ‘पठाण’मध्ये शाहरुख खानसह जॉन अब्राहम दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका आहेत.