शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार आहेत. दोघेही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बिग बी आणि शाहरुख खान या दोघांनीही आपल्या करिअरमध्ये एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बिग बी आणि शाहरुख २८ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाले आहेत.

सध्या सगळीकडेच वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांची क्रेझ आहे. सध्या बरेच सेलिब्रिटीज अशा वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहेत. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आज म्हणजे १५ डिसेंबरपासून सुरु झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अर्जित सिंग, जया बच्चन, अमिताभ बच्चन आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Photos : अपशब्द, धार्मिक भावनांना ठेच, अन्…; बॉलिवूडमधील वादग्रस्त गाण्यांची यादी एकदा बघाच

चित्रपट महोत्सवाला सुरवात झाल्यानंतर शाहरुख खानने बंगाली भाषेत आपले मनोगत व्यक्त केले तसेच या महोत्सवात त्याचा सत्कार करण्यात आला. सत्कार केल्यानंतर त्याने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या पाय पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा या चित्रपट महोत्सवात उपस्थित होते. त्यांनी शाहरुखला देशाचा हिरो म्हणून संबोधित केले. या महोत्सवाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. २२ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव असणार आहे. सध्या शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचा आगामी ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम गाण्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे. तसेच या चित्रपटातला बॉयकॉट करण्याची सोशल मीडियावर होत आहे. पठाण बरोबरच शाहरुख खान ‘जवान’ आणि ‘डंकी’ चित्रपटात दिसणार आहे.