बॉलीवूडमध्ये सध्या लग्नसोहळ्याचं वातावरण सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लग्नबंधनात अडकले आणि कालच मीरा चोपडा आणि रक्षित यांचा लग्नसोहळा पार पडला. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. अशातच आता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा १५ मार्चला लग्नगाठ बांधणार आहेत.

अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा यांनी फेब्रुवारीमध्येच साखरपुडा उरकला होता. आता या कपलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. यांचा लग्नसोहळा तीन दिवस चालणार आहे. पुलकित आणि क्रिती दिल्लीमध्ये सप्तपदी घेणार असल्याचं बोललं जातयं, तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अशीही चर्चा आहे की, हरियाणामधल्या मानेसर येथे दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. परंतु, कपलने यावर काहीही खुलासा केलेला नाही.

हेही वाचा… “माझ्या मुलांनी पळून जाऊन…” अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याबद्दल ट्विंकल खन्नाने केलं भाष्य

याबरोबरच सोशल मीडियावर पुलकितच्या घराचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात त्याचं घर रोषणाईने सजवलेलं आहे. या कपलच्या लग्नाची पत्रिकासुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानुसार १३ मार्चला संगीत, १४ मार्चला हळद आणि १५ मार्चला लग्नाचे विधी होतील. हे कपल पंजाबी पद्धतीनुसार लग्न करण्याच्या चर्चाही सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट गेल्या पाच वर्षांपासून डेट करत आहेत. दोघं सध्या ‘लिव्ह इन’मध्ये रहात असल्याचं सांगण्यात येतं. पुलकित आणि क्रितीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर काही महिन्यांपूर्वीच पुलकितचा ‘फुकरे ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर क्रिती लवकरच ‘रिस्की रोमियो’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच दोघे ‘तैश’, ‘पागलपंती’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटांत एकत्र झळकले होते.